Google Doodle Celebrates Rukhmabai Rauts Birth Anniversary देशातील अगदी सुरुवातीच्या स्त्री डॉक्टरांपैकी एक म्हणजे डॉ. रखमाबाई राऊत. स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या शूर महिलेचा आज जन्मदिवस. गुगलनेही डॉ. रखमाबाई राऊत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. Google Goodle गुगलच्या होमपेजवर डॉ. रखमाबाई राऊत यांचे डुडल झळकत आहे.

रखमाबाई यांचा २२ नोव्हेंबर १८६४ साली मुंबईत जन्म झाला. रखमाबाईंचा १८७५ साली म्हणजेच वयाच्या ११ व्या वर्षी विवाह झाला. त्यांची आई जयंतीबाई यांचाही बालविवाहच झाला होता. वयाच्या १४ व्या वर्षी जयंतीबाई यांचे लग्न लावून देण्यात आले आणि एकाच वर्षात त्यांच्या पोटी रखमाबाईंचा जन्म झाला. रखमाबाई अवघ्या दोन वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र वयाच्या १७ वर्षी विधवा झालेल्या जयंतीबाई यांनी त्या काळात दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरे लग्न केले.
रखमाबाई यांचे वयाच्या ११व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी लग्न लावून देण्यात आले. त्याकाळी मुलगी वयात येईपर्यंत माहेरीच राहायची. रखमाबाई यादेखील माहेरीच होत्या. त्या वयात आल्यावर पती दादाजी भिकाजी रखमाबाईंना सासरी नेण्यासाठी आले. मात्र रखमाबाईंनी ठामपणे दादाजींसोबत जाण्यास नकार दिला. यानंतर रखमाबाईंनी इंग्लंडमध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले. वडील डॉ. सखाराम राऊत हे त्यांच्या पाठीशी उभे होते. १८८४ साली म्हणजे रखमाबाईंच्या वयाच्या २०व्या वर्षी त्यांचे पती दादाजी भिकाजी यांनी मुंबई उच्च न्यायलयात वैवाहिक हक्कासाठी याचिका दाखल केली. पत्नीने आपल्यासोबत राहावे अशी मागणी दादाजी यांनी केली. दादाजींची मागणी योग्य असल्याचे सांगत न्यायालयाने रखमाबाईंना थेट ‘पतीबरोबर राहा किंवा तुरुंगात जा’ असे आदेश दिले. पण खमक्या रखमाबाईंनी या निर्णयाविरोधात प्रदीर्घ लढा दिला. त्या काळात महिलेने स्वत:च्या हक्कासाठी न्यायालयाची पायरी चढणे सामान्य गोष्ट नव्हती. त्यामुळेच माध्यमांमध्येही या खटल्याबद्दल बरेच वृत्तांकन झाले. महिला सुधारणेसाठी लढणाऱ्या रमाबाई रानडे, बहिरामजी मलबारी यांचेही या खटल्याने लक्ष्य वेधून घेतले. अखेर दादाजी यांनी माघार घेत तडजोड करण्यास होकार दिला. दिर्घकाळ चाललेल्या या खटल्याच्या आधारावर १८९१ साली संमतीच्या वयाचा कायदा (Age of consent act) अस्तित्वात आला. हा कायदा विवाहनंतर पतीबरोबर संबंध ठेवण्यासंदर्भातील सर्वात महत्वाच्या कायद्यांपैकी एक आहे.

sarpanch viral video | Wife caught husband with girlfriend
सरपंचाचं लफडं बायकोनं पकडलं; नवऱ्याबरोबर कारमधून फिरणाऱ्या गर्लफ्रेंडची केली अशी अवस्था की…; VIDEO झाला व्हायरल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
WATCH Radhika Merchant and Anant Ambani’s fun Turkish ice cream moment in Dubai goes viral
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी फिरत आहेत दुबईत! Turkish आइस्क्रिम खाताना राधिकाचा मजेशीर Video होतोय Viral
Mother saved her daughter from an accident video went viral on social media
हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम
hotel Photo Viral
बायकोला वैतागलेल्या नवऱ्यांसाठी खास ठिकाण! हॉटेलच्या नावाची पाटी वाचून चक्रावले नेटकरी, पाहा Viral Photo
Viral Rickshaw Hording Photo |
“देवानंतर पत्नीच…” रिक्षामागे पठ्ठ्याने लिहिलं असं काही की VIDEO पाहून युजर म्हणाले, “भावाने अनुभव…”
boy visiting museum joke
हास्यतरंग :  पुतळा तोडलास…

लग्न झाले असले तरी रखमाबाईंनी शेवटपर्यंत आपल्या माहेरचेच आडनाव लावले. आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा समाजाला फायदा व्हावा म्हणून त्यांनी ३५ वर्षे रुग्णांची सेवा केली. त्या काळात इतक्या दिर्घ कालावधीसाठी सेवा देणाऱ्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. वैद्यकीय क्षेत्राबरोबर त्यांनी बालविवाहाच्या प्रथेविरोधात आणि महिलांच्या एकांतवासासंदर्भात लेखनही केले. महिलांची सामाजिक स्थितीवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या लिखाणाने अनेकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आणि खऱ्या अर्थाने महिलांच्या विकासाठीची ब्लू प्रिंटच त्यांनी या लेखनातून मांडली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

शेवटपर्यंत समाजसेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या रखमाबाई यांचे वयाच्या ९१व्या वर्षी २५ सप्टेंबर १९५५ साली निधन झाले.