ICC Men’s Cricket World Cup 2023 : आज ५ ऑक्टोबर २०२३ पासून आयसीसी पुरुष वर्ल्ड कप २०२३ (ICC Men’s Cricket World Cup 2023 ) सुरू होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने एकदिवसीय विश्वचषक २०२३ क्रिकेट खेळाची सुरुवात होईल.१९७५ पासून स्थापन झालेल्या आयसीसी पुरुष वर्ल्ड कपची १३ वी आवृत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चतुर्वार्षिक प्रमुख स्पर्धेचे आयोजन भारत करत आहे. तर या निमित्ताने गुगलने (Google) आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे आणि एक खास डूडल (Doodle) तयार केलं आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी गुगलने खास डूडल तयार केलं आहे. हे डूडल ॲनिमेटेड स्वरूपात आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीत क्रिकेट खेळाचे चित्र तयार केलं आहे. या डूडलमध्ये दोन बदके त्यांच्या पंखात बॅट घेऊन मैदानात धावताना दिसत आहेत. तसेच तुम्ही या ॲनिमेटेड चित्रावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला कोणत्या संघाची मॅच कधी होणार याची सविस्तर माहिती समोर दिसेल. गुगलने हे खास डूडल त्यांच्या ट्विटर अकाउंटवरूनसुद्धा पोस्ट केलं आहे. क्रिकेट खेळासाठी गुगलचं खास डूडल एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघाच…
हेही वाचा… मुंबईत धावत्या बेस्ट बसला लटकून तरुणांचा प्रवास; Video पाहून आधी दया येईल पण खरं जाणून व्हाल संतप्त
पोस्ट नक्की बघा :
वर्ल्ड कपसाठी खास डूडल :
गुगलवरही क्रिकेटची क्रेज पहायला मिळते आहे. तसेच तुम्ही गुगल क्रोम (Chrome) जेव्हा उघडाल तेव्हा तुम्हाला गुगल (google) या शब्दात ‘ओ’ (O) च्या जागी चेंडू तर ‘एल’ (L) या अक्षराच्या जागी बॅटचे चित्र चित्रित करण्यात आलेलं दिसेल. तसेच हे खास डूडल तुम्ही सोशल मीडियावरसुद्धा शेअर करू शकता. तसेच जिथे तुम्ही गुगलवर एखादी गोष्ट शोधण्यासाठी मजकूर लिहिता, त्याच्या अगदीच वर दोन बदके क्रिकेट खेळताना दिसतील आणि त्यावर तुम्ही क्लिक केलेत की, तुम्हाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रकही दिसेल.
सोशल मीडियावर गुगलने त्यांच्या अधिकृत @GoogleIndia या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून डूडलची एक झलकसुद्धा दाखवली आहे आणि खास कॅप्शनसुद्धा लिहिले आहे. गुगल अनेकदा सणांदरम्यान किंवा काही खास दिवसांसाठी डूडल तयार करत असतो; तर आज डूडलने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी खास डूडल तयार केलं आहे, जे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे