अशा फार कमी व्यक्ती असलीत ज्यांचा आणि गुगलचा काही संबंध येत नसेल. जगाच्या उत्पत्तीपासून ते जगाचा शेवट कधी होणार इथपर्यंतची सरसकट उत्तरं गुगल आपल्याला देतं. आपण प्रश्न विचारायची खोटी त्याचं उत्तर गुगलकडे तयारच असतं. त्यामुळेच कदाचित ‘गुगल से बचकर कहां जाओगे’ यासारखी वाक्य वापरली जातात.
गुगल मॅप, गुगल ट्रान्सलेट, डूडलचा गेम अशा एक ना अनेक गोष्टींनी गुगल आपली मदत आणि मनोरंजन करत असतं. आता गुगलने त्यांच्या उपभोक्त्यांसाठी अजून एक आगळावेगळा अॅप आणला आहे. ‘ड्युओ अॅप’. खास मोबाईल युझर्ससाठी बनवलेला हा व्हिडिओ कॉलिंग अॅप अॅन्ड्रॉइड आणि आयफोन यांमध्ये सहज वापरता येऊ शकतो. वाय-फाय आणि मोबाईल इण्टरनेटवरही हा अॅप सहज सोप्या पद्धतीने चालतो.
या अॅपची खासियत म्हणजे हा अॅप डाऊनलोड केल्यावर इमेल आयडी द्यायची गरज नाही. तुमचा फक्त मोबाईल नंबरही पुरेसा आहे. तुमच्या मोबाईलमधले नंबर सहज शोधून व्हिडिओ कॉलिंगने मित्र-परिवाराशी मनसोक्त गप्पा मारता येऊ शकतात.
याआधीही गुगलचे स्वतःचे ‘हँगआऊट’ हे व्हिडिओ कॉलिंग अॅप होते. पण, या अॅपसाठी गुगलचं स्वतःचं अकाउंट असणं आवश्यक होतं. सध्याच्या स्पर्धात्मक जगात जिकडे मोबाईल अधिक जलद चालण्यासाठी ‘फेसबूक’, ‘व्हॉट्सअॅप’, ‘मॅसेंजर’, ‘स्काइप’ हे अॅप मायक्रोसॉफ्टने घेतले आहेत, तर अॅपलचा ‘फेसटाइम’ हा अॅप आयओएस फोनसाठी वापरला जातो.
काय आहे ‘ड्युओ’
* हा व्हिडिओ कॉलिंग अॅप अॅन्ड्रॉइड आणि आयओएस सिस्टिमच्या कोणत्याही फोनवर चालू शकतो.
* आप्तेष्ट, मित्र-परिवाराला फोन करण्यासाठी खूप सोपा असा हा अॅप आहे
* हा अॅप डाऊनलोड करण्यासाठी गुगल अकाउंटची गरज नाही. अॅन्ड्रॉइड आणि आयओएस मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या नंबरला सहजरित्या फोन करता येऊ शकतो.
* या अॅपने फक्त एकाच व्यक्तीबरोबर व्हिडिओ कॉलिंग करता येऊ शकते. यामुळे कोणताही ग्रुप एकत्र व्हिडिओ कॉलिंग करुन बोलू शकणार नाही.
गुगलचे नवे व्हिडिओ कॉलिंग ‘ड्युओ अॅप’
या अॅपची खासियत म्हणजे हा अॅप डाऊनलोड केल्यावर इमेल आयडी द्यायची गरज नाही
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-08-2016 at 12:34 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google launches duo chat app to rival skype facetime