भारतीय घरांमध्ये वडिलांची प्रतिमा अशी मानली जाते की वडील नेहमीच कठोर असतात, टोमणे मारतात. हेच कारण आहे की बहुतेक मुले मग ती मुलगा असो वा मुलगी, आईसोबत सर्व काही शेअर करतात, पण तीच गोष्ट वडिलांना सांगण्यासाठी घाबरतात किंवा त्यांना सांगू शकत नाहीत. मात्र, वडिलांचे मुलांवर प्रेम नसते असे नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा मुलं हळूहळू मोठी होतात आणि त्यांना जबाबदाऱ्या समजू लागतात तेव्हा त्यांना कळते की वडील म्हणजे काय आणि वडिलांची भूमिका काय असते. वडिलांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी जगातील सर्व देशांमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी वडिलांना खास वाटावे म्हणून साजरा केला जातो. गतवर्षीप्रमाणेच आज १९ जून २०२२ रोजी फादर्स डे निमित्त सर्च इंजिन गुगलने खास डूडल बनवले आहे.

फादर्स डे निमित्त गुगलच्या डूडलमध्ये एक लहान आणि एक मोठा हात दिसत आहेत. यामध्ये वडील आणि मूळ पेंटिंग करत असल्याचे कळते. वडील आणि मूळ आपल्या हाताचा ठसा कागदावर उमटवत आहेत. वडिलांना समर्पित फादर्स डेच्या डूडलमध्ये मुल वडिलांची प्रतिमा कशी बनते हे स्पष्टपणे दिसत आहे.

Father’s Day 2022: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या बाबांना भेट म्हणून द्या ‘हे’ खास गॅजेट्स

फादर्स डेचे महत्त्व

वडिलांच्या त्याग, प्रेम, जबाबदारी याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण आयुष्य जरी कमी असले तरी तरीही वडिलांप्रती असलेले प्रेम, आदर आणि भावना व्यक्त करण्यासाठी फादर्स डेची मदत घेता येते.

फादर्स डेचा इतिहास

सोनोराला आई नव्हती आणि तिच्या वडिलांनीच इतर पाच भावंडांसह सोनोराला दोन्ही पालकांचे प्रेम दिले आणि वाढवले. आपल्या वडिलांचे प्रेम, त्याग आणि समर्पण पाहून सोनोराच्या मनात विचार आला की, आईच्या मातृत्वाला समर्पित म्हणून मातृदिन साजरा केला जाऊ शकतो, तर वडिलांच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सन्मान म्हणून ‘फादर्स डे’ही साजरा करता येईल.

माहितीनुसार, १९१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी फादर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. त्यानंतर १९२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी फादर्स डे हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून घोषित केला, त्यानंतर १९६६ मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची घोषणा केली. १९७२ मध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला होता.