Google Special Doodle For Chandrayaan 3 : भारताची चांद्रयान- ३ मोहिम बुधवारी यशस्वी झाली अन् संपूर्ण जगभरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव झाला. नासानेही इस्त्रोचं अभिनंदन केलं असतानाच आता गुगलनेही इस्त्रोला यशस्वी झाल्यामुळे खास डुडल बनवून शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने हे जबरदस्त डुडल ट्विटरवर शेअर करत म्हटलंय, चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्याबद्दल गुगलवर डुडलद्वारे सेलिब्रेशन केलं जात आहे. या गुगल डुडलद्वारे चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. दररोज गुगलाच होम पेज उघडल्यावर तुम्हाला एक स्माईल नक्कीच दिसेल.
जवळपास सहा आठवड्यांपूर्वी चांद्रयान-३ भारत देशवासीयांच्या साक्षीने अंतराळात सोडण्यात आलं होतं. चांद्रयान-३ चे लाईव्ह दृष्य पाहण्यासाठी इस्त्रोच्या परिसरात लोकांनी तोबा गर्दी केली होती. या विक्रॅम लँडरला चंद्रावर पाहण्याची कोट्यावधी भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. चंद्रावर घडणाऱ्या अनेक वैज्ञानिक गोष्टींचा शोध लावण्यासाठी हे लँडर उपयोगी ठरणार आहे. अमेरिका आणि रशियासारख्या बड्या देशांना मागे टाकत भारताने चंद्रयान-३ मोहिम यशस्वीपणे पार पाडली आहे.
भारताचं चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचलं आणि सर्वच स्तरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव झाला. हा ऐतिहासिक क्षण सर्वांनीच दृश्यप्रणालीच्या माध्यमातून अनुभवला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा क्षण अविस्मरणीय असल्याचं म्हटलं आहे. अशातच आता भारतीय क्रिकेट संघानेही चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.