Viral News: प्रवास करताना लोकेशन समजण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. याच्या मदतीने रस्त्याची माहिती मिळते त्यामुळेच प्रवास करताना अडचण येत नाही. गुगल मॅपमुळे अनेकांना रस्ते शोधण्यास सोपे झाले आहे. मॅपच्या आधारे कुठेही कुणालाही न विचारता तुम्ही पोहचू शकता. परंतु अनेकदा या मॅपमुळे काही असे पाहायला मिळते ज्याची कल्पनाही कुणी केली नसेल. एका व्यक्तीसोबत नेमके हेच घडले जेव्हा त्याने घरातून बाहेर पडल्यानंतर गुगल मॅप पाहिले त्यात जे काही दिसले त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्याने गुगल मॅपवर असं काही पाहिलं की त्याचा संसारच उद्ध्वस्त झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुगल मॅपने केली पोल-खोल

तर झालं असं की रस्त्याशेजारी असलेल्या बेंचवर पतीने आपल्या पत्नीला पर पुरुषासोबत इंटिमेट होताना पाहिले, आपल्या पत्नीचे हे फोटो त्याने गुगल मॅपद्वारे पाहिले होते. यावेळी त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषाचे डोके मांडीवर ठेऊन त्याच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरवत होती. पेरूची राजधानी लीमा येथील हा फोटो गुगल कॅमेऱ्याने क्लिक केला. पतीने जेव्हा हा फोटो झूम करून पाहिला तेव्हा या महिलेने तेच कपडे घातले होते जे त्याच्या पत्नीकडे होते. हा फोटो २०१३ चा आहे जो पतीने आता पाहिला होता. याचा अर्थ गेल्या अनेक वर्षापासून पत्नी पतीला धोका देत होती.

प्रकरण पोहोचलं घटस्फोटापर्यंत

या फोटोचे सत्य उघड झाल्यानंतर पतीसमोर पत्नीने तिच्या अफेअरची कबुली दिली. सध्या या दोघांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यक्तीने अलीकडेच फेसबुकवरून फोटो शेअर केले.

पाहा फोटो

Image- गूगल मॅप

हेही वाचा >> VIDEO: उतारवयात आजोबांनी बायकोला दिलं असं गिफ्ट; आजीलाही बसला आश्चर्याचा धक्का

हे प्रकरण सोशल मीडियावरही चांगलंच व्हायरल झालं, त्यानंतर नेटकरीही यावर संमीश्र प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला हे प्रकरण वाचून काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google maps causes divorce after husband spots cheating wife cuddling another man news viral on social media srk