Google Hotel: Google आपले कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसकडे वळवण्यासाठी नवीन आयडिया शोधून काढली आहे. आता गुगलने आपल्या कॅम्पसमध्ये खास हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा सुरू केली आहे. या हॉटेलमधून कर्मचारी कॅलिफोर्निया मुख्यालय आणि खास माउंटन एरियाचा आनंद घेऊ शकतात. पण,ही विशेष ऑफरकडे पाहता, कर्मचारी होणारा खर्च आणि वर्क-लाइफ बॅलन्सबाबत थोडेसे चिंतेत आहेत.
गुगलने ३० सप्टेंबरपर्यंत पूर्णवेळ कर्मचाऱ्यांसाठी हा तात्पुरती योजना सुरू केला आहे. यामध्येही काही अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. कर्मचार्यांना वैयक्तिक क्रेडिट कार्डने पैसे द्यावे लागतील कारण त्यांच्या व्यावसायिक प्रवासात हॉटेलचे मुक्काम समाविष्ट नाही. गुगलने आपले हायब्रीड वर्क मॉडेल निश्चित करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे.
सकाळच्या धावपळीतून सुटका
सकाळच्या धावपळीतून सुटका आणि झोपण्यासाठी जास्त तासाची कल्पना करा. हे हॉटेल गुगलच्या ४२ एकर परिसरात आहे. नासाचे एम्स रिसर्च सेंटर त्याच्या अगदी बाजूला आहे. हॉटेलमध्ये एक सुंदर रूफटॉप डेक आहे आणि आठवड्याच्या शेवटी लोकल एक्टिविटीज देखील केले जाऊ शकतात. या हॉटेलमध्ये ४००० लोक एकाच वेळी राहू शकतात.
हेही वाचा – बारमध्ये जास्त दारू प्यायली तर आता घरापर्यंत पोहचवणार सरकार, ‘या’ देशात लागू केला नियम
काही कर्मचाऱ्यांना ही कल्पना अजिबात आवडली नाही. काहींना या करारामुळे वाटते की, ”ते त्यांचे पैसे फक्त Google ला देत आहेत.
” काही लोकांना असे वाटते की, ”यामुळे त्यांच्या काम आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलन देखील कमी होईल.”
लोकांनी या ऑफरबाबत आर्थिक प्रश्नही उपस्थित केला की,”एका रात्रीच्या मुक्कामासाठी ९९ डॉलर भरणे म्हणजे Google च्या हॉटेलमध्ये महिन्याला ३००० डॉलर जमा करण्यासारखे आहे.”
लोकांनी असेही म्हटले आहे की,”पेक्षा कमी खर्च ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी करतात.”
एका कर्मचाऱ्याने सांगितले की,”जर ते एका रात्रीत $ ६० घेत असतील तर ते चांगले होईल, परंतु $ ९९ खूप जास्त आहे.’
हेही वाचा – बाळाला असं कोण शांत करतं? बाळाचे रडणं थांबवण्यासाठी आईने चक्क दुधाच्या बाटलीत ओतली दारू अन्…
त्याच वेळी, एका कर्मचाऱ्याने सांगितले की,”मला याचा फायदा घ्यायचा आहे, ३००० डॉलर मध्ये तुम्हाला पूर्णतः सुसज्ज, अमर्यादित जेवण, घरकाम आणि साफसफाई यासारख्या सुविधा मिळत आहेत”
गुगलने अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांच्या रिमोट वर्कसाठी प्राधान्य देत ही ऑफर दिली आहे. कंपनी अजूनही फायद्यात असली तरी, ऑफिसमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे.