अभिनेत्री हेमांगी कवीने सोमवारी इन्स्ताग्राम व्हिडीओवरील ट्रोलिंगवरुन पोस्ट केलेल्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टची मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे या पोस्टमुळे हेमांगीबद्दल केवळ बातम्यांमध्ये आणि टीव्ही चॅनेल्सवर चर्चा होत नसून गुगल ट्रेण्ड्समध्येही हेमांगीचीच पर्यायने बुब्स आणि ब्राचीच चर्चा आहे. हेमांगीने तिच्या लेखणीच्या मदतीने गुगल ट्रेण्ड्समध्येही अनेक दिग्गजांना पिछाडीवर टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेमांगीची चर्चा इतकी आहे की मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील करोना परिस्थितीपेक्षा हेमांगी कवीबद्दल गुगलवर अधिक चर्च झालं आहे. इतकच काय तर रोज राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावापेक्षा हेमांगीबद्दल अधिक सर्च झाल्याचं दिसून आलं आहे. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे पॅन इंडिया गुगल सर्चच्या ट्रेण्डमध्ये मागील काही दिवसांपासून ब्रा (Bra) या सर्च टर्मच्या रिलेटेट टर्ममध्ये हेमांगीचे नाव आघाडीवर आहे. म्हणजेच मागील काही दिवसांमध्ये ब्रा असं गुगलवर सर्च करणाऱ्यांनी या सर्चचा संबंध थेट हेमांगीचा संदर्भ देऊन करण्यात वाढ झालीय. ही वाढ थोडी थोडकी नसून तब्बल एक हजार टक्क्यांहून अधिक आहे.

नक्की पाहा हे फोटो >> ब्रा ते बुब्स अन् कमोड ते लघुशंका… ट्रोलर्सलाच ट्रोल करणारी, न बोलल्या जाणाऱ्या विषयावर लिहिणारी ‘कवी’

मागील सात दिवसांमध्ये हेमांगी कवीसंदर्भात सर्चमध्ये १०० टक्क्यांनी वाढ झाल्याचं गुगल ट्रेण्ड्सवर दिसत आहे. त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील सर्च फारच कमी असल्याचं गुगल ट्रेण्डच्या आकडेवारीमध्ये दिसत आहे.

केवळ राजकीय नेतेच नाही सध्याच्या घडामोडींबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्र करोनाव्हायरस या टर्मपेक्षाही हेमांगी कवीबद्दल अधिक सर्च झाल्याचं गुगल ट्रेण्डच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

हेमांगीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टची चर्चा इतकी आहे की भारतभरामध्ये गुगल ट्रेण्ड्सच्या आकडेवारीत Bra या शब्दाशी संबंधित रिलेटेड सर्चमध्ये हेमांगीबद्दलच्याच टर्म दिसत आहेत. म्हणजे ब्रासंदर्भात सर्च करताना त्याचा थेट संबंध हेमांगीशी जोडून सर्च करणाऱ्यांची आकडेवारी अधिक आहे. ब्रासंदर्भात रिलेटेट क्वेरीजमध्ये हेमांगी कवी, हेमांगी कवी पोस्ट, हेमांगी कवी इन्स्ताग्राम टॉपीक चर्चेत असल्याचं दिसत आहे.

एकंदरितच हे ट्रेण्ड पाहता हेमांगीची केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये चर्चा असल्याचं आणि तिने नक्की काय पोस्ट केलं याबद्दल गुगलवरुन चर्च करणाऱ्या भारतीयांचं प्रमाणही फार असल्याचं दिसत आहे.