Google To Delete Gmail: X पाठोपाठ आता गूगलच्या काही सेवांमध्ये सुद्धा एलॉन मस्क स्टाईलचे बदल घडवून आणले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू आहे. स्वतः मस्क यांनी आज एक मजेशीर मीम पोस्ट केला होता ज्यामध्ये गूगलचा लोगो लावण्यात आला होता आणि त्यावर बंदूक रोखलेली आहे. आज सकाळपासून X वर जीमेल हा टॅग सुद्धा ट्रेंड होत आहे. यापूर्वी एका कमेंटला उत्तर देताना मस्क यांनी लवकरच जीमेल ऐवजी Xmail लवकरच सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यात आजच्या बंदूक पोस्टनंतर जीमेल बंद पडून Xmail सुरु होणार असल्याची चर्चा रंगली आहे. लाइटहाऊस जर्नलिझमला सुद्धा असेच एक पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असल्याचे आढळले. ‘गुगल जीमेल बंद करत आहे’, असे या पत्रात म्हटले आहे. १ ऑगस्ट २०२४ पासून, Gmail अधिकृतपणे बंद होईल. या तारखेनंतर जीमेल खाती वापरता येणार नाहीत, असेही या पत्रात म्हटले आहे.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Aadith Sheth ने व्हायरल पत्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले .

Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
"Worked Overtime": Gen Z Employee's Excuse For Coming Late The Next Day Boss and employee chat viral on social media
PHOTO: “मी उद्या उशीराच येणार…” कर्मचाऱ्यानं बॉसला मेसेज करत थेटच सांगितलं; चॅट वाचून नेटकरी म्हणाले “बरोबर केलं जशास तसं”
kerala ias officer Row
Keral IAS officer: हिंदू-मुस्लीम व्हॉट्सॲप ग्रुप बनवणं महागात पडलं; केरळमध्ये दोन आयएएस अधिकारी निलंबित
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
father Thomas d souza
वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा, व्हॅटीकन सिटीच्या पोपकडून घोषणा
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
A hoax bomb threat, Bharati Vidyapeeth medical college
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल

इतर वापरकर्त्यांनी देखील व्हायरल पत्र शेअर केले.

एलॉन मस्क पोस्ट

तपास:

गूगलने जीमेल बंद केल्याचे रिपोर्ट्स तपासून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला एक बातमी आढळली जिथे गूगलने खोट्या पत्रावर एक प्रतिक्रिया दिली होती.

https://timesofindia.indiatimes.com/gadgets-news/gmail-is-shutting-down-google-responds-and-how-the-hoax-message-scared-users/articleshow/107934605.cms

आम्हाला Gmail च्या अधिकृत X अकाउंट वर देखील या पत्राबद्दल एक पोस्ट केल्याचे दिसून आले.

आम्हाला एक बातमी सापडली ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “जेमिनीने युनाइटेड स्टेटसमधील काही ऐतिहासिक व्यक्तींचे फोटो एडिट करण्यास नकार दिल्याबाबत गूगलने माफी मागितल्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात गूगलने जीमेलच्या कारकिर्दीचा आता सूर्यास्त होणार असल्याचे लिहिले आहे.” बातमीत पुढे म्हटले आहे की ही माहिती खोटी होती. टेक जायंटने अधिकृतपणे प्लॅटफॉर्म बंद करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या.

https://www.timesnownews.com/world/google-shutting-down-gmail-after-gemini-backlash-post-goes-viral-article-107923702

आम्हाला काही पोस्ट सुद्धा आढळल्या ज्यात पुष्टी केली होती की Gmail बंद होत नाही आहे.

मात्र, एका बातमीनुसार, गूगल येत्या काही कालावधीत दोन वर्षांपासून न वापरलेली किंवा साइन इन नसलेली खाती बंद करण्याच्या तयारीत आहे. या निष्क्रिय खात्यांमधून ईमेल, गूगल ड्राइव्ह, गूगल डॉक्स, कॅलेंडर आणि गूगल फोटोसहित सर्व डेटा डिलीट केला जाऊ शकतो.

https://abcnews.go.com/Business/google-begins-process-deleting-inactive-gmail-accounts/story?id=105281283#:~:text=Google%20will%20begin%20purging%20accounts,protect%20users%20from%20security%20threats.

निष्कर्ष: गूगल आपले प्रमुख उत्पादन जीमेल बंद करणार नसून टेक कंपनीने त्याच्या एआय-चॅटबॉट जेमिनीसाठी माफी मागितल्यानंतर हा दावा सुरू झाला आहे. व्हायरल अफवा खोट्या आहेत.