Google To Delete Gmail: X पाठोपाठ आता गूगलच्या काही सेवांमध्ये सुद्धा एलॉन मस्क स्टाईलचे बदल घडवून आणले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू आहे. स्वतः मस्क यांनी आज एक मजेशीर मीम पोस्ट केला होता ज्यामध्ये गूगलचा लोगो लावण्यात आला होता आणि त्यावर बंदूक रोखलेली आहे. आज सकाळपासून X वर जीमेल हा टॅग सुद्धा ट्रेंड होत आहे. यापूर्वी एका कमेंटला उत्तर देताना मस्क यांनी लवकरच जीमेल ऐवजी Xmail लवकरच सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यात आजच्या बंदूक पोस्टनंतर जीमेल बंद पडून Xmail सुरु होणार असल्याची चर्चा रंगली आहे. लाइटहाऊस जर्नलिझमला सुद्धा असेच एक पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असल्याचे आढळले. ‘गुगल जीमेल बंद करत आहे’, असे या पत्रात म्हटले आहे. १ ऑगस्ट २०२४ पासून, Gmail अधिकृतपणे बंद होईल. या तारखेनंतर जीमेल खाती वापरता येणार नाहीत, असेही या पत्रात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा