Bank holidays 2025: २०२५ हे नवीन वर्ष आता सुरु झाले आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने वर्षभरातील बँक सुट्ट्यांची सर्वसमावेशक यादी जारी केली आहे. २०२५ मध्ये, भारतीय बँक या सुट्ट्यांदिवशी बंद राहणार आहे. ही यादी बँका केव्हा बंद राहतील किंवा लोकांसाठी सुरु राहतील हे स्पष्ट करते. मुख्य सुट्ट्यांमध्ये २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन, १४ मार्च रोजी होळी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आणि २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती यांचा समावेश करण्यात आला आहे. इतर उल्लेखनीय सुट्ट्यांमध्ये गुड फ्रायडे, बैसाखी, मोहरम, दसरा, दुर्गा पूजा आणि दिवाळी यांचा समावेश आहे. यंदा दिवाळीचा सण २० ऑक्टोबर रोजी येणार आहे. या यादीमध्ये विविध क्षेत्रांतील सुट्ट्यांचा समावेश आहे. सरस्वती पूजा, महाशिवरात्री आणि इतर अनेक राज्यानुसार विशिष्ट सुट्ट्यांसह २०२५ मधील भारतातील सर्व बँक सुट्ट्यांसाठी येथे संपूर्ण मार्गदर्शक यादी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा