Chhath Puja 2024 Date, Time, Significance in Marathi : यंदा छठ पूजा ५ नोव्हेंबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत साजरी केली जाणार आहे. चार दिवसाच्या या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या चार दिवसांमध्ये सूर्य देव आणि छठी देवीची पूजा केली जाते. बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. महिला मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी या कालावधीत निर्जळी उपवास करतात. (google trend Chhath Puja 2024 why chat puja celebrated know the importance of four days of festival)
छठ पूजा का साजरी केली जाते?
शास्त्रांनुसार, कार्तिक महिन्यात सूर्य त्याच्या नीच राशीमध्ये विराजमान असतो त्यामुळे सूर्यदेवाची विशेष उपासना केली जाते जेणेकरून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये. षष्ठी तिथीचा संबंध थेट मुलांच्या आयुष्यावर दिसून येतो. त्यामुळे सूर्य देव आणि षष्ठी पूजेमुळे अपत्य प्राप्ती आणि अपत्यांच्या आयुष्याची सुरक्षा केली जाते.
काही अभ्यासकांचे मते, प्रभू राम आणि देवी सीता लंकेतून अयोध्येत विजयी होऊन परतल्यानंतर त्यांनी सूर्यदेवासाठी उपवास आणि यज्ञ केला होता तेव्हापासून ही प्रथा अस्तित्त्वात आल्याचे मानले जाते.
छठ पूजा – चार दिवसांचा सण
छठ पूजाच्या या सणातून निसर्गाचा सन्मान केला जातो. पहिल्या दिवसाल ‘नाहा खा’ असे म्हणतात. उपवास करणारी व्यक्ती स्नान केल्यानंतरच जेवण करतात. अंघोळीनंतरच्या जेवणात भोपळ्याची भाजी असते.
दुसर्या दिवसाला ‘खरना’ म्हणतात, या दिवशी उपवास करणारी व्यक्ती रात्री एकवेळचे जेवण करतात ज्यात रोटी आणि खीर (तांदळाची खीर) असते .रोटी-खीर जेवणानंतर ३६ तासांचा उपवास सुरू होतो, ज्या दरम्यान पाणीही पीता येत नाही.
तिसर्या दिवशी भाविक पाणवठ्यावर जातात. देवाला अर्पण केलेले सर्व प्रसाद दिव्यांबरोबर सूपात मध्ये ठेवतात आणि सूर्यास्त होताच, उपवास करणारी व्यक्ती अर्ध्य म्हणून सूपची पूजा करतात. याला सांज का अर्ध्य किंवा संध्याकाळचे अर्पण म्हणतात.
चौथ्या दिवशी, ‘भोर का अर्ध्य’ नावाचा उगवत्या सूर्यासाठी, पहाटेच्या वेळी विधी केला जातो. त्यानंतर देवतेकडे कृतज्ञता व्यक्त करून भाविक उपवास सोडतात.