JEE Advanced 2025 New Eligibility Rules : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT कानपूरने संयुक्त प्रवेश परीक्षा (प्रगत) २०२५ साठी पात्रता निकष जारी केले आहेत. अपडेटनुसार, जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced 2025) मध्ये बसण्याच्या प्रयत्नांची संख्या आता तीन करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही या परीक्षेसाठी तीन वेळा प्रयत्न करू शकता. यापूर्वी, JEE Advanced मध्ये प्रयत्नांची संख्या दोन वेळेपुरती मर्यादित होती. आता ही मर्यादा वाढवली असून यापुढे ही परीक्षा तीन वेळा देता येणार आहे; तर IIT JEE Advanced हा कीवर्ड सध्या गूगल ट्रेंडमध्ये सर्च होताना दिसतो आहे. तर उमेदवार जेईई ॲडव्हान्स २०२५ साठी (JEE Advanced 2025) पात्रता निकष खाली दिलेल्या माहितीत तपासू शकतात…
पर्फोमन्स (Performance ) :
जेईई ॲडव्हान्स २०२५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बी.ई / बी. टेक ( B.E./B.Tech) पेपर I मध्ये टॉप २,५०,०० हजार उमेदवारांमध्ये (सर्व कॅटेगरीसह) स्थान मिळवणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit) :
२०२५ च्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म १ ऑक्टोबर २००० रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. तसेच एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांना पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे, म्हणजेच हे उमेदवार १ ऑक्टोबर १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले असावेत.
किती वेळा परीक्षा देऊ शकता (Number of attempts ) :
JEE (Advanced) परीक्षा एक विद्यार्थी एकाच वर्षी तीन वेळा देऊ शकतो. म्हणजे तीन वेळा एकाच वर्षांमध्ये किंवा उमेदवार सलग तीन वर्षांत जास्तीत जास्त तीन वेळा परीक्षेसाठी प्रयत्न करू शकतात.
पात्रता :
उमेदवाराने २०२३, २०२४ किंवा २०२५ मध्ये इयत्ता १२ वी परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित अनिवार्य विषयांसह दिलेली असावी. जे उमेदवार २०२२ मध्ये किंवा त्यापूर्वी प्रथमच बारावी परीक्षेत बसले होते, ते जेईई परीक्षेमध्ये बसण्यास पात्र नाहीत.
कोणत्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळेल ?
जर विद्यार्थ्याने आधीच आयआयटीमध्ये प्रवेश घेतला असेल, पण त्याने त्या कार्यक्रमात काहीही शालेय काम केले नसेल किंवा त्याने IIT च्या सीटवर ऑनलाइन किंवा रिपोर्टिंग सेंटरला जाऊन प्रवेश घेतला तरी तो विद्यार्थी आता जेईई ॲडव्हान्स २०२५ साठी परीक्षा देऊ शकणार नाही. तसेच विद्यार्थ्याला आयआयटीमध्ये प्रवेश दिला गेला असेल आणि त्याला नंतर काढून टाकले गेले असेल, तर तो विद्यार्थीदेखील जेईई ॲडव्हान्स २०२५ साठी पात्र नाही.
उमेदवार JEE Advanced 2025 पात्रता निकषांसाठी अधिकृत अधिसूचना येथे तपासू शकतात…
जेईई ॲडव्हान्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार जेईई मेन २०२५ जानेवारी सेशनसाठी अधिकृत वेबसाइट – jeemain.nta.nic.in वर २२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.
जेईई मेन २०२५ साठी अर्ज कसा करावा (How To Apply For JEE Advanced 2025) :
- सगळ्यात आधी jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होम पेजवर “ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर जेईई (मेन) – २०२५ सेशन १” असे लिहिलेलं असेल त्यावर क्लिक करा.
- आता ‘न्यू रजिस्ट्रेशन’ टॅबवर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
- आता सिस्टमने जनरेट केलेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डसह लॉग इन करा आणि अर्ज भरा.
- अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउटसुद्धा घ्या.
- तर अशाप्रकारे जेईई ॲडव्हान्ससाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात.