Jeevan Praman Patra Offline Submission : सर्व पेन्शनधारकांनी पेन्शन मिळणे सुरू ठेवण्यासाठी वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सबमिशन विंड १ नोव्हेंबर रोजी ८० वर्षांखालील लोकांसाठी उघडण्यात आली आहे. सुमारे ६९.७६ लाख केंद्र सरकारचे पेन्शनधारक आहेत. पेन्शनधारकांनी प्रमाणपत्र थेट बँक पोस्ट ऑफिस किंवा इतर नियुक्त ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबरपासून पेन्शन देयके बंद केली जातील. हा विषय सध्या चर्चेत असून गुगल ट्रेंड होत आहे. जीवन प्रमाणपत्र ऑफलाइन आणि ऑनलाइन हे जाणून घ्या.

पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारक खालील पद्धती वापरून त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात:

Aadhaar-is-not-proof-of-age-supreme-court-1
‘Aadhar Card’ला जन्म तारखेचा पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कारण काय? कोणती कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
hardeep singh nijjar death certificate canada
हरदीप सिंह निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास कॅनडाचा नकार; राष्ट्रीय तपास संस्थेला प्रमाणपत्र का हवेय?
mother and son died drowning Nashik district,
नाशिक जिल्ह्यात बंधाऱ्यात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू
Deputation in MPSC by circumventing the rules
नियम डावलून ‘एमपीएससी’मध्ये प्रतिनियुक्ती? माहिती अधिकार अर्जाला काय दिले उत्तर?
Supreme Court on Aadhar Card
Aadhaar Card : “आधार कार्डावरची जन्मतारीख वय निश्चितीसाठीचा पुरावा नाही”, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Loneliness-Free Seoul
एकाकी मृत्यू म्हणजे काय? त्यांची संख्या का वाढतेय? ते रोखण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक कशासाठी?
unified pension scheme
Money Mantra: युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय? याचा फायदा कोणाला मिळणार आहे?

जीवन प्रमाण पोर्टलवर अर्ज भरून ओळख प्रमाणित करणे (Jeevan Pramaan Portal)

  • डोअरस्टेप बँकिंग (DSB) एजंटच्या मदतीने ओळख प्रमाणित करणे (Doorstep Banking (DSB) Agent)
  • पोस्ट ऑफिसमध्ये बायोमेट्रिक उपकरणे वापरून ओळख प्रमाणित करणे (Biometric Devices at Post Offices)
  • बँकेच्या शाखांमध्ये फिजिकल लाइफ सर्टिफिकेट फॉर्म भरुन ओळख प्रमाणित करणे (Physical Life Certificate Forms at Bank Branches)

जीवन सन्मान प्रमाणपत्र ऑनलाइन कसे सबमिट करावे (How to Submit a Jeevan Pramaan Certificate Online)

  • पेन्शनधारक जीवन प्रमाण आणि आधार फेस आरडी ॲप्सद्वारे (Aadhaar Face RD apps) चेहरा, बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळ स्कॅन करून ( iris recognition) बायोमेट्रिक तंत्रज्ञान (biometric technology)वापरून त्यांची ओळख प्रमाणित करू शकतात.
  • तुमचा आधार क्रमांक पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे (जसे की तुमची बँक किंवा पोस्ट ऑफिस) अपडेट केला आहे याची खात्री करा.
  • Google Play Store वरून ‘AadhFaceRD’ आणि ‘जीवन प्रमान फेस ॲप’ इंस्टॉल करा.
  • पेन्शनधारक व्यक्तीबद्दल आवश्यक माहिती द्या.
  • छायाचित्र काढल्यानंतर माहिती द्या.
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर जीवन सन्मान प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंकसह एसएमएस पाठवेल.
  • जीवन सन्मान प्रमाणपत्र ऑफलाइन कसे जमा करावे
  • प्रमाणपत्र थेट बँक, पोस्ट ऑफिस किंवा इतर ठिकाणीजमा करणे आवश्यक आहे.

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख (Last Date for Life Certificate Submission)

८० वर्षांखालील व्यक्ती १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान जीवन प्रमाणपत्रे सादर करू शकतात. सुपर ज्येष्ठ नागरिकांना ८० व त्याहून अधिक वयाचे)१ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यं त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये, केंद्राने बँकांना ज्येष्ठ पेन्शनधारकांना नोव्हेंबर ऐवजी दरवर्षी १ ऑक्टोबरपासून त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले.

सर्टिफिकेट जमा करण्याची अंतिम मुदत चुकवण्याचे परिणाम (Consequences of Missing the Submission Deadline for Life Certificate))

पेन्शनधारक अंतिम मुदतीपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात अयशस्वी झाल्यास, पुढील महिन्यापासून पेन्शन वितरण थांबवले जाईल. पण जीवन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर देयके पुन्हा सुरू होतील.

 Google Trend Life certificate
Google Trend Life certificate (सौजन्य गुगल ट्रेंड)

१.८ लाखांहून अधिक पेन्शनधारक विशेष डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा लाभ घेतात: केंद्र (Over 1.8 lakh pensioners take benefits of special digital life certificates campaign: Centre)

वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की केंद्राने १ नोव्हेंबर रोजी सुरू केलेल्या विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी १.८ लाखांहून अधिक पेन्शनधारकांनी त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार केले. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ८०० शहरे आणि जिल्ह्यांमध्ये मोहीम पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DoPPW) तिसरे देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) सुरू केले आहे.