Petrol And Diesel Price In Maharashtra: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. यातच आता पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क २ रुपयांनी, तर डिझेलवरील उत्पादन शुल्कही २ रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. हे बदल आज मंगळवारपासून लागू झाले आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आलं आहे. दरम्यान, इंधनावरील कर वाढला असला तरी पेट्रोल-डिझेलचे भाव जैसे थे स्थितीत आहेत.

आज ०८ एप्रिल २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price in Marathi)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०५.१४९१.६४
अकोला१०४.१३९०.६९
अमरावती१०५.४३९१.९४
औरंगाबाद१०५.१८९१.६८
भंडारा१०४.८८९१.४१
बीड१०५.४४९२.०३
बुलढाणा१०५.०३९१.५५
चंद्रपूर१०४.९२९१.४७
धुळे१०४.५७९१.१०
गडचिरोली१०५.४९९२.००
गोंदिया१०५.५५९२.०९
हिंगोली१०५.४५९१.९२
जळगाव१०५.५०९२.०२
जालना१०५.५४९२.०७
कोल्हापूर१०४.४४९०.९९
लातूर१०५.२५९१.७६
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.५८९१.१३
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.१०९०.६३
उस्मानाबाद१०५.२१९१.७२
पालघर१०४.०३९०.५४
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०४.०३९०.५६
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.४६९१.०१
सातारा१०५.३२९१.८१
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.६२९१.१५
ठाणे१०३.८०९०.३१
वर्धा१०४.८८९०.९४
वाशिम१०४.८९९१.४२
यवतमाळ१०५.३७९१.८९

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.