Coldplay India Tour 2025 : सध्या सगळीकडे लाइव्ह कॉन्सर्ट, स्टँडअप कॉमेडी शोची क्रेझ पाहायला मिळते. अनेक जण या शोची तिकिटे ऑनलाइन बुक करताना दिसतात. मुंबईत जानेवारी महिन्यात ग्रॅमी अवॉर्ड विजेता पॉप बँड कोल्डप्लेचा कॉन्सर्ट होणार आहे. या कॉन्सर्टची तिकिटे बुक माय शो या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवण्यात आली होती, पण देशभरातील चाहत्यांना हा कॉन्सर्ट पाहायचा असल्यामुळे तिकीट विक्रीची साईट क्रॅश झाली होती. फार कमी लोकांना याची तिकिटे मिळाली आहेत. दरम्यान, बुक माय शोने फसवणुकीचा इशारा देऊनही कोल्डप्ले मुंबई कॉन्सर्टची तिकिटे तीन लाख रुपयांना पुनर्विक्रीच्या प्लॅटफॉर्मवर विकली गेली आहेत.

जानेवारी २०२५ मध्ये बुक माय शोने मुंबई कॉन्सर्टसाठी तिकीट खिडकी उघडल्याने ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्लेने रविवारी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. ख्रिस मार्टिन, गाय बेरीमन, विल चॅम्पियन, जॉनी बकलँड आणि फिल हार्वे (व्यवस्थापक) यांचा समावेश असलेला हा बँड १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियम, नवी मुंबई येथे सादरीकरण करणार आहे. मात्र, बुक माय शोने चेतावणी दिल्यानंतरही अनधिकृत तिकीट प्लॅटफॉर्मवर लोक तीन लाखांपर्यंत तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करताना दिसले. मात्र, तिथेही त्यांना तिकीट मिळालं नाही. तिसरा शो असूनही काही मिनिटांत तिकिटे विकली गेल्याने हजारो चाहत्यांची निराशा झाली. दरम्यान, सोशल मीडियावरही कोल्डप्ले मुंबई कॉन्सर्टची तिकिटे पुनर्विक्रीच्या प्लॅटफॉर्मवर विकली जात असल्याची तसेच फसवणुकीची टीका आणि आरोप होऊ लागले आहेत.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक

सोशल मीडिया हँडल एक्सवर विजय नारायण या युजरने तिकिटांमध्ये सुरू असणाऱ्या घोटाळ्यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने कोल्डप्लेची तिकिटे @bookmyshow प्रमाणेच पण काळ्या बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने जास्त कशी मिळतात? असा सवाल केला आहे. तर हा संपूर्ण एक घोटाळा आहे, असा आरोपही त्यानी केला आहे.

BookMyShow आणि BookMyShowLive च्या अधिकृत हँडल्सवरून फॅन्सना ऑनलाइन तिकीट घोटाळ्यांबद्दल कॉन्सर्टमध्ये जाणाऱ्यांना अलर्ट करून फसवणुकीची कल्पना दिली होती, तरीही फॅन्स अनधिकृत वेबसाइटवरून तिकीट खरेदीचा प्रयत्न करत होते. BookMyShow आणि BookMyShowLive च्या अधिकृत हँडल्सवर फसवणुकीची कल्पना देताना कंपनीने, “तिकीट घोटाळ्यापासून स्वतःचे रक्षण करा! कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर २०२५ साठी भारतात बनावट तिकिटे विकणाऱ्या अनधिकृत प्लॅटफॉर्मला बळी पडू नका! आमच्या निदर्शनास आले आहे की, अनधिकृत प्लॅटफॉर्म्स अधिकृत विक्रीच्या आधी आणि नंतर, भारतात Coldplay च्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर २०२५ साठी तिकिटांची यादी करत आहेत, ही तिकिटे अवैध आहेत.” पुढे असं लिहिलंय की, “अशाप्रकारे तिकीट काढणे भारतात बेकायदा आहे आणि कायद्याने दंडनीय आहे. BookMyShow हे तिकीट विक्रीचे एकमेव अधिकृत व्यासपीठ आहे,” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत २,५०० ते रु. १२,५०० आणि ३५,००० इतकी आहे.

हेही वाचा >> “आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी

कोल्डप्ले म्हणजे काय?

१९९७ मध्ये स्थापन झालेला कोल्डप्ले हा ब्रिटीश रॉक बँड असून त्यात गायक आणि पियानोवादक ख्रिस मार्टिन, गिटार वादक जॉनी बकलँड, बासवादक गाय बेरीमन, ड्रमर आणि तालवादक विल चॅम्पियन आणि व्यवस्थापक फिल हार्वे यांचा समावेश आहे.

गुगल ट्रेंड्समध्ये कोल्डप्ले

कोल्डप्लेने त्यांच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूरच्या तारखा जाहीर केल्यापासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, त्यामुळे सध्या कोल्डप्ले हा विषय ट्रेंडिंगवर आहे..