Google Trending Mahindra Thar Roxx Clocks : आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीने त्यांच्या कारचे बुकिंग सुरू केलं आहे. १५ ऑगस्ट रोजी भारतीय बाजारपेठेत महिंद्रा थार रॉक्स (Mahindra Thar ROXX) लाँच करण्यात आली. दीड महिन्याहून अधिक कालावधीनंतर आज ३ ऑक्टोबर २०२४ रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून या कारचे बुकिंग सुरू झालं. तुम्ही महिंद्रा ॲण्ड महिंद्राच्या वेबसाइटवर जाऊन बुकिंग करू शकता. या गाडीची डिलिव्हरी दसऱ्यापासून सुरू होईल. यादरम्यान हा ‘थार रॉक्स बुकिंग’ (Mahindra thar roxx booking) हा शब्द गूगल ट्रेंड्सवर मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आला आहे.
काल २ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजून २४ मिनिटांनी हा कीवर्ड ट्रेंड होत आहे. पण, आज ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी हा कीवर्ड सर्वाधिक सर्च करण्यात आला. कारण- अवघ्या ६० मिनिटांत महिंद्रा थार रॉक्स (Mahindra Thar ROXX)च्या जवळजवळ १.७६ लाख एवढी बुकिंग करण्यात आली आहे. त्यामुळे या थारबद्दलची उत्सुकता ग्राहकांमध्ये वाढली असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा…‘साधी भोळी माझी आई…’ ऑफिसमध्ये एअरपॉड्स पोहचवण्यासाठी आईचा जुगाड; लेकीने शेअर केला PHOTO
गूगल ट्रेंड्सनुसार महिंद्रा थार रॉक्स बुकिंग (thar roxx booking) हा शब्द चंदिगडमध्ये सर्वांत जास्त सर्च करण्यात आला. त्यानंतर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर यांचा क्रमांक लागतो. तसेच गूगल ट्रेंड्सने हेदेखील स्पष्ट केले, “बुक थार रॉक्स, महिंद्रा थार ४ x ४ प्राईज , थार रॉक्स कलर्स, महिंद्रा शो रूम नीयर मी, थार रॉक्स बुकिंग रेकॉर्डस्, थार रॉक्स बुकिंग स्टेट्स” आदी संबंधित प्रश्न अनेक युजर्सनी गूगलवर सर्च केले आहेत. महिंद्र ग्रुपच्या मॉडेलची पहिल्या दिवसातील सर्वाधिक बुकिंग म्हणून ही चर्चा होताना दिसते आहे. त्यामुळे हा कीवर्ड गूगल ट्रेंडवर सर्वाधिक सर्च होताना दिसतो आहे.
फीचर्स व किंमत :
महिंद्रा थार रॉक्स बुकिंग (thar roxx booking ) मध्ये 2.0-लिटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन आहे के 160 bhp जास्तीत जास्त पॉवर देते आणि 330 Nm टॉर्क जनरेट करते. तर 2.0-लिटर mHawk डिझेल इंजिन जे 150 bhp आणि 330 Nm जनरेट करते. दोन्ही इंजिने एक तर सहा-स्पीड मॅन्युअल किंवा सहा-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्स्मशनशी जोडलेली असणार आहेत. महिंद्रा ॲण्ड महिंद्राने नवीन थार ROXX च्या 4×4 प्रकारांची किंमत १.७९ लाखांपासून सुरू होईल, जी २२.४९ लाख रुपयांपर्यंतच्या एक्स-शोरूम) रेंजमध्ये आहे.