Monkeypox Cause and Treatment : एम्पॉक्स म्हणजेच मंकीपॉक्स (Mpox) या विषाणूजन्य रोगाने जागतिक स्तरावर कहर केला आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असताना हा व्हायरस आता गूगल ट्रेंड्सवर (Google Trends) सर्वाधिक शोधला जाणारा कीवर्ड ठरला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये गूगल ट्रेंड्सवर mpox या कीवर्डमध्ये चढ-उतार दिसला. त्याचप्रमाणे ९ सप्टेंबर रोजी मंकीपॉक्स हा शब्द सर्वाधिक सर्च करण्यात आला, कारण याचदिवशी भारतातही मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण आढळून आला. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशातून परतलेल्या तरुणामध्ये हा विषाणू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

प्रयोगशाळा चाचणीद्वारे या रुग्णामध्ये पश्चिम आफ्रिकन क्लेड २ च्या मंकीपॉक्स विषाणूचा व्हायरस असल्याचे दर्शवले आहे. भारतात जुलै २०२२ पासून आधीच ३० रुग्णांची नोंद झाली आहे. पण, डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार हे सर्व रुग्ण क्लेड १ मंकीपॉक्स विषाणूचा व्हायरस असल्याचे म्हटले आहे.

एम्पॉक्स सर्वाधिक शोधला जाणारा कीवर्ड :

गूगल ट्रेंड्सनुसार ३५ उप-प्रदेशांमध्ये, मंकीपॉक्स हा शब्द मिझोरममध्ये सर्वात जास्त सर्च करण्यात आला. त्यानंतर मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, गोवा यांचा क्रमांक लागतो आणि शहरांमध्ये, आयझवाल, इंफाळच्या लोकांनी मंकीपॉक्स हा शब्द सर्वात जास्त शोधला आहे. तसेच गूगल ट्रेंड्सने हे देखील स्पष्ट केले की, “केरळ मंकीपॉक्स, मंकीपॉक्स क्लेड १ इन इंडिया, देसी इंडियन, मंकीपॉक्स, मंकीपॉक्स बंगळुरू विमानतळ, मंकीपॉक्स रोग केरळ” आदी संबंधित समस्या अनेक युजर्सनी गूगलवर सर्च केल्या आहेत.

हेही वाचा…‘बाबा, खूप खूप आभार…’ सरप्राईज पाहून चिमुकला रडला; VIRAL VIDEO पाहून आठवतील लहानपणीचे दिवस

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो लोकांमध्ये, प्रामुख्याने जवळच्या संपर्काद्वारे आणि कधीकधी वातावरणातून पसरू शकतो. याव्यतिरिक्त मंकीपॉक्सने संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तू आणि पृष्ठभागांद्वारे म्हणजेच व्यक्तीने वापरलेल्या वस्तू, कपडे यांच्याद्वारे हा रोग इतरांमध्ये पसरू शकतो.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे :

मंकीपॉक्समध्ये अंगावर पुरळ येतात; जे दोन ते चार आठवडे शरीरावर राहतात. मंकीपॉक्स आजाराची सुरुवात ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, कमी उर्जा, सुजलेल्या ग्रंथी (लिम्फ नोड्स) आदी गोष्टींनी सुरू होऊ शकते. मंकीपॉक्स पुरळ, फोड किंवा फोडांसारखे दिसतात. मंकीपॉक्स आजारादरम्यान आलेले पुरळ चेहरा, हाताचे तळवे, पायाचे तळवे, मांडीचा सांधा, जननेंद्रिय आणि/किंवा गुदद्वारावर परिमाण करू शकतात. हे व्रण तोंड, घसा, गुदद्वार, गुदाशय किंवा योनी किंवा डोळ्यांवरदेखील आढळू शकतात.

उपलब्ध आकडेवारीनुसार, मंकीपॉक्समुळे ०.१% ते १०% लोकांचा मृत्यू झाला आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, प्रत्येक रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अनेक घटकांमुळे भिन्न असू शकते. जसे की, आरोग्य सेवेपर्यंत प्रवेश आणि आधारभूत इम्युनोसप्रेशन म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होणे किंवा इम्यून सिस्टम कमजोर होणे. याचबरोबर अज्ञात HIV किंवा प्रगत HIV आजारामुळे म्हणजेच काही लोकांना HIV विषाणूची माहिती नसू शकते किंवा त्यांच्या स्थितीमध्ये गंभीरता असू शकते, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते; असेही WHO ने म्हटले आहे.