Gold Silver Price Today : दिवाळीनंतर या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली. गुरूवारी सोने चांदीचे दर पहिल्या सत्रात कमी होते पण त्यानंतर दुसर्‍या सत्रात दरामध्ये तेजी दिसून आली. आज सुद्धा सोन्याच्या दरात थोडी घसरण दिसून येत आहे तर चांदी ७० रूपयांनी वाढली आहे. तुळशी विवाहानंतर लग्न समारंभ सुरू होतात, अशात लग्नसराईपूर्वी सोने चांदीच्या दरामध्ये दिसून येत असलेल्या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजचा सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१, १९८ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,६७० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९२६ रुपये आहे म्हणजेच चांदी ९२,९१० रुपये प्रति किलो आहे. एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ७९,०२० रुपये होता आणि चांदीचा दर ९५,७५० रुपये किलो होता.

हेही वाचा : तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१,०७८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७७,५४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,०७८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,५४० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,०७८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,५४० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,०७८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,५४० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

हेही वाचा : एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google trends gold silver prices down today on 8 november 2024 check latest rates in your city ndj