Gold Silver Rate Today 4 December 2024 : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे. दिवाळीनंतर सोन्याचा दर ७९ हजारांवरुन थेट ७५ हजारांपर्यंत घसरला होता. यामुळे ग्राहकांना ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोनं खरेदीसाठी चांगली संधी होती, मात्र काही दिवसांतच हे दर पुन्हा वाढले. आठड्याभराचा विचार केल्यास १० ग्रॅम सोन्याचा दर ७७ हजारांच्या जवळपास आहे. पण हे दरही दररोज कमी- जास्त होत आहे. आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ७६, ८७० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९२,०६० रुपये आहे, एकूण सोन्याच्या दरात ३ डिसेंबरच्या तुलनेत जवळपास ९० रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीचा दर २३० रुपयांनी वाढला आहे. पण ४ डिसेंबरला मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 4 December 2024 Google Trends)

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, बुधवारी, ४ डिसेंबरला सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर ७६, ८७० रुपये नोंदवला होता, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,४६४ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ हजार रुपये इतका होता.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश

दरम्यान चांदीच्या दरातही आज २३० रुपयांची वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ९२,०६० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ८७,९४० रुपये होता. सोन्या-चांदीच्या दरात सतत होणारे चढ -उतार पाहता ग्राहक चिंता व्यक्त करत आहेत.

Gold Silver Price 4 december 2024 On Google Trends
आजचा सोन्या-चांदीचा दर ४ डिसेंबर २०२४ गुगल ट्रेंड्स (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today 4 December 2024)

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,४९२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,९०० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,४६४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,८७० रुपये इतका आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,४६४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,८७० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,४६४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,८७० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Story img Loader