IOCL Apprentice Recruitment 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने अनेक राज्यांमध्ये ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १३ फेब्रुवारी २०२५ या अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या तारखेनंतर सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या IOCL गुगलवर ट्रेंड होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये गुगल ट्रेंडमध्ये नोकरी आणि शिक्षण कॅटेगरीमध्ये IOCL तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

IOCL Apprentice Recruitment 2025: रिक्त पदांची माहिती(Vacancy Details)

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)चे उद्दिष्ट दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये तांत्रिक आणि गैर-तांत्रिक भूमिकांमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे.

IOCL Apprentice Recruitment 2025: पात्रता निकष(Eligibility Criteria)

ट्रेड अप्रेंटिस: दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
टेक्निशियन अप्रेंटिस: संबंधित विषयात पूर्णवेळ तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे.
पदव्युत्तर अप्रेंटिस: किमान ५०% गुणांसह पूर्णवेळ पदवी (बीबीए/बीए/बीकॉम/बीएससी) असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी तपशीलवार पात्रता अटींसाठी अधिकृत अधिसूचना पहावी.

IOCL Apprentice Recruitment 2025: वयोमर्यादा(Age Limit)

३१ जानेवारी २०२५ रोजी अर्जदारांचे वय १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट लागू आहे.

IOCL Apprentice Recruitment 2025: निवड प्रक्रिया (Selection Process)

कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे.
निवडलेल्या उमेदवारांना १२ महिन्यांचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाईल.
इच्छुक उमेदवारांना लवकर अर्ज करण्याचा आणि सर्व पात्रता निकष पूर्ण झाल्याची खात्री करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

सध्या IOCL गुगलवर ट्रेंड होत आहे.

IOCL Apprentice Recruitment 2025: अधिकृत अधिसुचना –

https://iocl.com/admin/img/Apprenticeships/Files/9cedf55da8134200833d0ef9c257df0e.pdf

IOCL Apprentice Recruitment 2025: अर्ज करण्याची थेट लिंक

– https://nr.ioclmd.in/

अधिक माहितीसाठी, अधिकृत आयओसीएल वेबसाइटला भेट द्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google trends iocl apprentice recruitment 2025 recruitment for 456 apprentice posts apply before february 13 know the recruitment process eligibility criteria vacancy details age limit selection proce