Art and Entertainment Top Trending Topics : चित्रपट मालिका, रिअ‍ॅलिटी शो, ओटीटी, सोशल मीडिया, यूट्यूब, पुरस्कार सोहळे या सर्व गोष्टी आजच्या काळातील मनोरंजनाची माध्यमे आहेत. मनोरंजन क्षेत्रातील अनेक गोष्टींची सर्वत्र चर्चा होत असते. कधी एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री चित्रपट किंवा मालिकेमुळे चर्चेत येत असतात. मनोरंजन क्षेत्रातील हे ट्रेंड दररोज बदलत असतात. सध्या Google Trends मध्ये ब्रिटिश अभिनेत्री मॅगी स्मिथ, भारतीय कॉमेडियन सुदेश लहरी, यूट्युबर रणवीर अलाहाबादिया, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी फिल्म अवॉर्ड्स, भगत सिंग हे पाच विषय ट्रेंडमध्ये आहेत. त्यापैकी पहिल्या क्रमांकावर ब्रिटिश अभिनेत्री मॅगी स्मिथ ट्रेंड होत आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कॉमेडियन सुदेश लेहरी ट्रेंडमध्ये आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया व चौथ्या क्रमांकावर इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी फिल्म पुरस्कार आहे. पाचव्या क्रमांकावर भगत सिंग हा विषयदेखील ट्रेंड होत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये मनोरंजन क्षेत्रासंबंधी Google Trends होणाऱ्या टॉप ५ विषयांबाबत जाणून घेऊ या.

मनोरंजन क्षेत्रातील Google Trendsमधील टॉप ५ विषय (Top 5 Topics in Google Trends in Entertainment)

१) मॅगी स्मिथ -ब्रिटीश अभिनेत्री ( Maggie Smith -British Actress)

मनोंरजन क्षेत्रातील गेल्या सात दिवसांच्या टॉप ५ गूगल ट्रेंडमध्ये सर्वांत प्रथम क्रमांवर मॅगी स्मिथ सर्च होत आहे. मॅगी स्मिथ ही एक ब्रिटिश अभिनेत्री आहे; ज्यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. दी प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी व कॅलिफोर्निया सूट या चित्रपटांसाठी मॅगी स्मिथ यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. २१ व्या शतकात डाऊनटन अॅबमेमधील ग्रँथमच्या डोजर काउंटेस आणि हॅरी पॉटरमधील प्रोफेसर मिनर्व्हा मॅकगोनागल अशा प्रसिद्ध भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. गेल्या सात दिवसांतील गूगल ट्रेंड्स पाहता, Maggie Smith -British Actress हा कीवर्ड ब्रेकआउट झाला आहे म्हणजेच हा कीवर्ड पाच हजार टक्क्यांपेक्षा जास्त वेळा सर्च केला गेला आहे.

couple hit each other
VIDEO : ‘नवरा-बायकोच्या नात्यावरचा विश्वास उडवणारी घटना’, भररस्त्यात एकमेकांना दिला बेदम चोप; गळा आवळून रस्त्यावर आपटल अन्…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bride dance Viral Video
‘नवरीनेच वरात गाजवली…’ नाचणाऱ्या घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नाद लागतो ओ..”
younger brother cried in the wedding of the elder sister
‘शेवटी भावाचं काळीज…’ सासरी जाणाऱ्या ताईला पाहून भाऊ ढसाढसा रडला… काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच
elephants proposed to their partner with Flowers
सोंडेत धरली फुले अन्… हत्तीने त्याच्या पार्टनरला केले असे प्रपोज; पाहा व्हायरल VIDEO
Emotional video of young girl driving cycle rikshaw for family responsibility viral video on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! तरुण मुलीचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Puneri video young girl stopped bikes were using footpaths said to follow traffic rules video viral on social media
नियम म्हणजे नियम! पुणेकरांच्या नादाला लागू नका; वाहतूक नियम मोडणाऱ्यांबरोबर तरुणीने काय केलं पाहा…, VIDEO व्हायरल
Viral Dance Video
‘आरारा खतरनाक…’, ‘उई अम्मा’ गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

२) सुदेश लेहरी – भारतीय कॉमेडियन (Sudesh Lehri – Indian Comedian)

मनोंरजन क्षेत्रातील गेल्या सात दिवसांमध्ये टॉप ५ गूगल ट्रेंड्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सुदेश लेहरी चर्चेत आहेत. सुदेश लेहरी हे भारतीय कॉमेडियन आहेत. कॉमेडियन सुदेश लेहरी काही दिवसांपूर्वी लाफ्टर शेफ या रिॲलिटी शोच्या सेटवर जखमी झाले होते. कुकिंगवर आधारित या कॉमेडी शोचे शूटिंग सध्या रखडले आहे. अलीकडेच ‘लाफ्टर शेफ’ला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. पहिल्या सीझनसाठी आवश्यक भाग आधीच शूट केले गेले असल्याने, टीमने कलाकारांना त्यांची इतर कामे पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी ब्रेक देण्याचा निर्णय घेतला. कलाकार या महिन्याच्या अखेरीस Extended version चे शूटिंग सुरू करतील. दरम्यान, या घटनेमुळे सुदेश लेहरी गूगलवर ट्रेंड होत आहेत. सुदेश लेहरी यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकांनी गूगलवर सुदेश लेहरी यांना काय झाले (what happened to sudesh lehri), सुदेश लेहरी यांनी ‘लाफ्टर शेफ’ सोडला आहे का? (sudesh lehri left laughter chef, what happened to sudesh lehri in laughter chef show, sudesh lehri ko kya hua), सुदेश लेहरी जिवंत आहेत का? (is sudesh lehri alive) असे प्रश्न सर्च केले गेले आहेत.

३)रणवीर अलाहाबादिया – युट्यूबर (Ranveer Allahbadia – YouTuber )

मनोंरजन क्षेत्रातील गेल्या सात दिवसांमध्ये टॉप ५ गूगल ट्रेंडच्या यादीत तिसऱ्या क्रमांकवररणवीर अलाहाबादिया सध्या ट्रेंड होत आहे. रणवीर अलाहाबादिया हा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. या युट्युबरचे Ranveer Allahbadia आणि Beer biceps नावाचे दोन यूट्यूब चॅनेल सायबर गुन्हेगारांनी हॅक झाले आहे. रणवीरचे युट्यूब चॅनल हॅक करून बीअर बायसेप्सचे नाव @Elon.trump.tesla_live2024 असे बदलण्यात आले. तर त्याच्या पर्सनल चॅनेलचे नाव बदलून @tesla.event.trump 2024 असे ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे Ranveer Allahbadia गूगलवर खूप ट्रेंडमध्ये आहे. दरम्यान, रणबीरबाबत जाणून घेण्यासाठी अनेकांनी ranveer allahbadia hacked, ranveer allahbadia channel hacked, ranveer allahbadia youtube channel असे प्रश्न सर्च केले आहेत.

हेही वाचा – पुण्यातील सर्वात मोठे मेट्रो स्टेशन! पाहा, स्वारगेट मेट्रो स्टेशन आतून कसे आहे? Video होत आहे Viral

३) इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी फिल्म अवॉर्ड्स (International Indian Film Academy Awards)

मनोंरजन क्षेत्रातील गेल्या सात दिवसांमध्ये टॉप ५ गूगल ट्रेंडच्या चौथ्या क्रमांकावर इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी फिल्म अवॉर्ड्स ट्रेंड होत आहे. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्सला आयफा अवॉर्ड्स म्हणूनही ओळखले जाते. तीन दिवस चालणारा आयफा अवॉर्ड्सचा २४ वा सोहळा २९ सप्टेंबरपासून अबू धाबीमध्ये उत्साहात सुरू झाला आहे. या सोहळ्याच बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती आणि त्यामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी, अनिल कपूर, बॉबी देओल, हेमा मालिनी, रेखा, शाहिद कपूर, कृती सेनन यांसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या सोहळ्यात अप्रतिम डान्स सादर करून सोहळ्याची रंगत वाढवली. या सोहळ्याचा होस्ट शाहरूख खानला ‘जवान’मधील त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर, राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला १२वी फेलसाठी विधू विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. अॅनिमल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला. अनिल कपूरला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला; तर बॉबी देओलला नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचा पुरस्कार व भूपिंदर बब्बलला त्याच्या ‘अर्जन वेल’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरुष पुरस्कार मिळाला.

Art and Entertainment Top Trending Topics on Google Trends in Marathi
मनोरंजन क्षेत्रातील गूगल टॉप ट्रेंडिंग टॉपिक्स (सौजन्य – गुगल ट्रेंड्स)

५) भगत सिंग (Bhagat Singh)

मनोंरजन क्षेत्रातील गेल्या सात दिवसांमध्ये टॉप ५ गूगल ट्रेंड्सच्या यादीत पाचव्या क्रमांकवर भगत सिंग हे चर्चेत होते. दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी शहीद भगत सिंग यांची जयंती साजरी केली जाते. हा दिवस भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण देणाऱ्या या तरुण स्वातंत्र्यसैनिकाच्या बलिदानाचा आणि धैर्याचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. क्रांतिकारक शहीद भगतसिंग आजही स्वतंत्र भारतातील तरुणांना प्रेरणा देत आहेत. या दिवशी भारतीय नागरिक भगत सिंग यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यामुळे गेल्या आठवड्यात गूगलमध्ये bhagat singh jayanti status, bhagat singh birthday quotes, bhagat singh birthday, veer bhagat singh jayanti हे कीवर्ड चर्चेत होते.

Story img Loader