Standard Glass Lining IPO Opening Date : शेअर मार्केट हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. मार्केटमध्ये सातत्याने नवनवीन आयपीओ येत असतात. मार्केटमध्ये कोणता नवीन आयपीओ आला आहे आणि हा आयपीओ नफा मिळवून देणारा आहे की नाही, याकडे गुंतवणूकदारांचे नेहमी लक्ष असते. सोमवारी शेअर मार्केटमध्ये दोन आयपीओची नोंदणी सुरू झाली आहे. पहिला आयपीओ म्हणजे स्टँडर्ड ग्लास लायनिंग (Standard Glass Lining) आणि दुसरा आयपीओ म्हणजे इंडोबेल इन्सुलेशन लिमिटेड (Indobell Insulation Limited). ग्रे मार्केटचा विचार केला तर स्टँडर्ड ग्लास लायनिंग आयपीओ शेअर मार्केटमध्ये दमदार कमाई करू शकतो. हा आयपीओ गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर निवडत आहेत. आज आपण स्टँडर्ड ग्लास लायनिंग आयपीओविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (New Ipo In share market Standard Glass Lining IPO check lot size IPO allotment and listing date and company details)

हेही वाचा : Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या, तुमच्या शहरातील भाव

Hexaware Technologies IPO news in marathi
टीसीएसनंतर ‘या’ आयटी कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ बाजारात येतोय; जाणून घ्या किंमत
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
EPFO settles record over 5 crore claims in FY25
‘ईपीएफओ’कडून दोन लाख कोटी रुपयांचे दावे निकाली
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे वर्ष शेअर बाजारासाठी…
SEBI
सेबीकडून चार Stock Brokers ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द, जाणून घ्या तुमच्याही ब्रोकरचा आहे का समावेश?
indian banks facing various challenges amid high interest rate
भारतीय बँकांना नफ्याला कोरड; जगातिक संस्थेचा इशारा नेमका काय?
share market update bse nifty share bazar stock market
Marker roundup : ‘सेन्सेक्स’मध्ये सलग दुसऱ्या सत्रात मजबूत ६३१ अंशांची भर; दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीमागील दडलंय काय?
Liquidity deficit in indian banking system hits lowest level in nearly 15 years
भारतीय बँकिंग व्यवस्थेची तरलता १५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर… खडखडाटामुळे कर्जे आणखी महागणार?

स्टँडर्ड ग्लास लायनिंगच्या आईपीओचा इश्यू साइज ४१०.०५ कोटी रुपये आहे. कंपनीने २१० कोटी रुपयांचे १.५० कोटी शेअर जारी केले आहेत. तसेच २००.०५ कोटी रुपयांचे शेअर ओएफएसद्वारे जारी केले आहेत. हा आयपीओ आज सोमवारपासून नोंदणीसाठी सुरू झाला आहे. ८ जानेवारीपर्यंत तुम्ही या आयपीओची नोंदणी करू शकतात. हा शेअर १३ जानेवारी रोजी मार्केटमध्ये लिस्ट होऊ शकतो.

प्राइस बँड किती आहे?

आयपीओची फेस व्हॅल्यू १० रुपये प्रति शेअर आहे. तसेच प्राइस बँड १३३ ते १४० रुपयांच्या प्रति शेअरपर्यंत आहे. एका लॉटमध्ये १०७ शेअर असणार आहेत. २३५ रुपयांच्यावर हे शेअर लिस्ट होऊ शकतात. गुंतवणूकदारांना कमीत कमी १४, ९८० रुपये गुंतवावे लागू शकतात. एक रिटेल गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटसाठी नोंदणी करू शकतो.

हेही वाचा : शेअर बाजारातील कंपन्यांकडे आहे भरपूर पैसा, अव्वल ५०० कंपन्यांच्या ताळेबंदात ७.६८ लाख कोटींची रोकड

कंपनीविषयी माहिती

स्टँडर्ड ग्लास लायनिंग कंपनीची स्थापना सप्टेंबर २०१२ मध्ये झाली. ही कंपनी फार्मास्युटिकल आणि केमिकल सेक्टरसाठी इंजिनिअरींग साहित्य तयार करते. हे साहित्य ग्सास लाइन, स्टेनलेस स्टील आणि निकेलपासून तयार केले जातात. याशिवाय ही कंपनी फार्मास्युटिकल आणि केमिकल कंपन्यांसाठी डिझाइन, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, असेंब्ली, इन्स्टॉलेशन इत्यादी कामे करते.

Story img Loader