Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. सध्या एका पाकिस्तानी महिलेचा एक डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओद्वारे महिलेने सांगितले की घटस्फोटानंतर आयुष्य संपत नाही. कोणत्याही महिलेसाठी घटस्फोट म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल. ही महिला पाकिस्तानची असून ती ट्रेडिशनल ड्रेसमध्ये सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. ती कोक पाकिस्तानच्या Maghron La गाण्यावर डान्स करताना दिसते. व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “घटस्फोट झालेली पाकिस्तानी आईसाठी यापेक्षा सुंदर गाणं कोणतं असू शकतं?”
पाहा व्हायरल व्हिडीओ
अजीमा एहसान या महिनेनी तिच्या azima_ihsan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. अजीमा ही तीन मुलांची सिंगल आई आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने समाजाविरोधात आवाज उचलत लिहिलेय, “पाकिस्तानी समाजामध्ये विशेषत: महिलांसाठी घटस्फोटाला मृत्यूची शिक्षा मानले जाते. मला म्हणाले की माझे आयुष्य संपले, मी पश्चाताप करणार, माझा आनंद संपला पण खरं तर मी आज खूप आनंदी आहे आणि डान्स करत आहे. असं जगण्यापेक्षा घटस्फोट घेणे कितीतरी पटीने चांगले आहे.”
ती पुढे लिहिते, “लग्न प्रेम आणि आदर सन्मानावर टिकले पाहिजे. सामाजिक दबावावर नाही. मी अनेक पाकिस्तानी महिलांना घटस्फोटाचा शिक्का आपल्यावर लागू नये म्हणून स्वत:ला संपवताना पाहिले. मी त्यांना सांगू इच्छिते, तुमचा आनंद खूप महत्त्वाचा आहे. तुमची इच्छा महत्त्वाचा आहे. आयुष्य थांबत नाही. घाबरू नका. दोन वर्षानंतर मी एक जीवंत पुरावा आहे की तुम्ही रडू शकता, तुम्ही ठीक होऊ शकता आणि पुन्हा कोणाचीही पर्वा न करता डान्स करू शकता.”
हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सोशल मीडियावर लोक तिच्या हिंमतीचे कौतुक करत आहे. अनेक युजर्सनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “मला खूप आवडलं. देव तुम्हाला आणखी बळ देवो” तर एका युजरने लिहिलेय, “तिची ऊर्जा खूप आवडली” आणखी एका युजरने लिहिलेय, “या महिलेपासून अनेक महिलांनी शिकायला पाहिजे.” एक युजर लिहितो, “प्रत्येक स्त्रीने स्वत:वर प्रेम करायला पाहिजे.” अनेक युजर्सनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.