Google Trends Passport Seva : गूगलवर सध्या पासपोर्ट सर्व्हिस हा एक सर्वाधिक ट्रेंड होणारा विषय आहे. आज गूगल सर्चमध्येही लोकांनी पासपोर्ट सर्व्हिस अधिक वेळा सर्च केल्याचे समोर आले; ज्यामुळे गूगल ट्रॅकवर पासपोर्ट सर्व्हिसचा अधिक सर्च व्हॉल्यूम दिसून आला. गूगल ट्रेसनुसार, मंगळवारी सकाळी ४ तास पासपोर्ट सर्व्हिस या टॉपिकच्या सर्चिंग व्हॉल्यूममध्ये ७५ टक्के वाढ दिसून आली. पण, लोक गूगलवर पासपोर्ट सर्व्हिस हा विषय का सर्च करीत आहेत ते जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोक गूगलवर पासपोर्ट सर्व्हिस सर्च करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल काही तांत्रिक कारणांमुळे बंद ठेवण्यात आले होते. याबाबत पासपोर्ट सेवा वेबसाइटवर एक नोटीस जारी करण्यात आली होती. त्या नोटिशीमध्ये, पासपोर्ट सेवा गुरुवार, २९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवार, २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत तांत्रिक कारणामुळे बंद असेल. या कालावधीत नागरिक आणि MEA/RPO/BOI/ISP/DoP/ पोलीस प्रशासनाला हे पोर्टल वापरण्यास उपलब्ध नसेल, असे नमूद करण्यात आले होते.

पासपोर्ट सेवा पुन्हा झाली सुरु (Passport Seva Portal Restored)

पण पासपोर्ट सेवा आता निश्चितपणे ऑनलाइन झाली आहे. विदेश मंत्रालयाने घोषणा केली आहे की, रविवार, १ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक आणि पोलीस अधिकारी अशा दोघांनाही हे पोर्टल आता सुलभपणे वापरता येणार आहे.

पोर्टलमधील तांत्रिक कामासाठी निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता होती. मात्र, निश्चित केलेल्या वेळेआधीच काम पूर्ण झाले. त्यावेळी वेबसाइटवरील पासपोर्टमधील सेवांचा लाभ घेताना काही अडचणी येत असल्याचे आढळले. पण, आता नागरिक पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट बुक करू शकतात, नवीन पासपोर्टसाठी अप्लाय करू शकतात आणि इतर सेवांपर्यंतही पोहोचू शकतात.

हेही वाचा – २.५ कोटींचे पॅकेज! भारतात पुढील २५ वर्षांत ‘या’ १० नोकऱ्यांमध्ये मिळू शकतो गलेलठ्ठ पगार

त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयाने इशारा देताना स्पष्ट केले आहे की, अनेक बनावट वेबसाइट आणि अर्ज ऑनलाइन फॉर्मच्या मदतीने भरण्यासाठी आणि पासपोर्ट अर्जासाठी अपॉइंटमेंट घेण्यासाठी अर्जदारांकडून जास्त शुल्काची मागणी करीत आहेत. त्यामुळे भारतीय पासपोर्ट आणि संबंधित सेवांसंदर्भात सर्च करणाऱ्या लोकांनी बनावट वेबसाइट्सपासून दूर राहावे आणि त्याद्वारे कोणतेही पेमेंट करू नये.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google trends passport seva among top trending topics o google search here is why how do i find trending topics on google trends passport sjr