Ratan Tata’s Manager Shantanu Naidu Gets Job In Tata Motors : दिवंगत भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा लाडका सहकारी शंतनू नायडू पुन्हा एकदा चर्चेत आल आहे. त्यामागचे कारण म्हणजे टाटा ग्रुपने शंतनूवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. टाटा मोटर्समध्ये त्याची जनरल जनरल मॅनेजर, हेड अँड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

रतन टाटांबरोबर शेवटपर्यंत सावलीसारखा उभ्या असलेल्या शंतनूला जगाचा निरोप देताना दिवंगत व्यावसायिकानं मैत्रीचं मोठ बक्षीस दिलं. इतकंच नाही, तर त्यांनी मृत्युपत्रातही शंतनू नायडू याचा उल्लेख केला आहे. त्यात आता त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शंतनूबाबत मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलं आहे?

रतन टाटा यांचं गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या शेवटच्या प्रवासातही शंतनू नायडू सर्वांत पुढे चालताना दिसला. रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांचं मृत्युपत्र उघडलं तेव्हा त्यांचा जवळचा मित्र शंतनू नायडू यांच्या नावाचा त्यात समावेश होता. मैत्रीचं बक्षीस म्हणून रतन टाटांनी मृत्युपत्रात शंतनूनं शिक्षणासाठी घेतलेलं वैयक्तिक कर्ज माफ केलं.

Shantanu Naidu-Ratan Tata google trends
रतन टाटा- शंतनु नायडू गुगल ट्रेंड

शंतनूचे वडील होते टाटा मोटर्सचे कर्मचारी

Shantanu Naidu-Ratan Tata google trends
रतन टाटा- शंतनु नायडू गुगल ट्रेंड

शंतनू नायडू यानं लिंक्डइनवर एक पोस्ट करीत टाटा मोटर्समधील मिळालेल्या मोठ्या जबाबदारीविषयीची माहिती दिली आहे.

Ratan Tatas Aide Shantanu Naidu Gets Top Role At Tata Motors It Comes Full Circle now
रतन टाटांच्या ‘लाडक्या’ शंतनू नायडूला Tata Motors मध्ये मिळाली मोठी जबाबदारी; पोस्ट झाली व्हायरल

त्यामध्ये त्यांनी लिहिले की, मला कळवण्यास आनंद होत आहे की, मी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर, हेड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज म्हणून काम सुरू करत आहे. मला आठवतंय की, जेव्हा माझे वडील टाटा मोटर्सच्या प्लांटमधून पांढरा शर्ट व नेव्ही ब्ल्यू पँटमध्ये घरी यायचे आणि मी खिडकीजवळ बसून त्यांची वाट पाहायचो. आता हे संपूर्ण चक्र पूर्ण झालं आहे.

Story img Loader