Monkeypox Google Trending Topic मंकीपॉक्स किंवा Mpox गेल्या सात दिवसातील गुगल सर्चमध्ये टॉप ट्रेंडिंग विषयांपैकी एक आहे. भारतापुरता विचार करायचा झाला तर गूगल ट्रेण्डस् वर या विषयाच्या शोधात ७०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते आहे. पाच लाखाहून अधिक लोकांनी याविषयाचा शोध घेतला आहे.

डब्ल्यूएचओने मंकीपॉक्स ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील चिंतेची बाब असल्याचे घोषित केल्यानंतर गुगल सर्चवर मंकीपॉक्सचा शोध सुरू झाला. विषाणू संसर्गाला अशाप्रकारे आणीबाणी घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) आणि आफ्रिकेतील देशांमध्ये वाढत्या रुग्णांच्या संख्येवरून या विषाणूंचा संसर्ग वेगात होत असल्याचे लक्षात आले आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार २०२२ पासून ११६ देशांमध्ये मंकीपॉक्समुळे किमान ९९,१७६ प्रकरणांची आणि २०८ मृत्यूची नोंद झाली आहे. लैंगिक संक्रमणाद्वारे या विष्णूच्या होणारा संसर्ग आणि प्रसार ही चिंतेची बाब आहे.

संपर्कातून प्रसार

मंकीपॉक्स हा एखाद्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातून प्रसार पावतो. यात चेहरा, त्वचेमार्फत, मुखाद्वारे किंवा चेहरा हे तोंड, लैंगिक संबंध अशा सर्वच माध्यमातून या रोगाचा प्रादुर्भाव होतो. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेवरील जखमांवर जोपर्यंत खपली धरत नाही, किंवा ती जखम पूर्णतः सुकून गळून पडत नाही आणि त्वचेचा नवीन थर येत नाही तोपर्यंत रुग्णाला संसर्गजन्य मानले जाते. या रोगाच्या प्रादुर्भावाचा पहिला टप्पा पहिल्या ५ दिवसांचा असतो. यात ताप, डोकेदुखी, लिम्फ नोड्सची (गळ्याच्या ग्रंथीची) सूज यांसारखी लक्षण दिसतात. शेवटचे एक लक्षण महत्त्वाचे आहे. ताप आल्याच्या दोन दिवसांत त्वचेवर आणि मोठ्या संख्येने चेहऱ्यावर पुरळ येतात. याशिवाय तळहात आणि चेहऱ्यावरही पुरळ दिसून येते. याशिवाय डोळे आणि गुप्तांगावरही त्याचा परिणाम दिसून येतो.

BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Can yo see Bird in Viral video See this magical Optical illusion
“दिसतं तसं नसतं!” तुम्हाला व्हिडीओमध्ये पक्षी दिसतोय का? पुन्हा एकदा नीट बघा
Kedarnath helicopter crash video viral
Kedarnath : हवेत घिरट्या घातल्या, हेलकावे खाल्ले अन् वायर तुटताच क्षणात…; पाहा हेलिकॉप्टर कोसळतानाचा थरारक VIDEO
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Dogs Fight with Leopard
शिकारीच बनला ‘शिकार’! कुत्र्यांच्या टोळीने बिबट्याचा केला मोठा गेम; थरारक Video व्हायरल, जंगलात नेमकं काय घडलं?
मिलिंद सोमण यांनी सांगितला फिटनेस मंत्र
“तुम्हाला जिमची गरज नाही, फक्त कॉमन सेन्स वापरा’, मिलिंद सोमण यांनी सांगितला फिटनेस मंत्र
Radikaa Sarathkumar says men secretly record videos of actresses in the nude
“अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा; म्हणाल्या, “माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”

२. स्त्री २ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

स्त्री २ या बॉलिवूडच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस आणि समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा घडवून आणली आहे. स्त्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २० कोटी इतकी मोठी कमाई केली आहे. १५ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सर्च व्हॉल्यूममध्ये १००० टक्क्यांची वाढ झाली आहे आणि हा गूगलवर सर्वाधिक शोधला जाणारा विषय आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट अमर कौशिक यांची निर्मिती असून सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये प्रचंड कमाई करणारा चित्रपट आजही तितक्याच दणक्यात सुरु आहे.

या चित्रपटाने मंगळवारी जोरदार कलेक्शन केले आहे. हा चित्रपट शनिवार-रविवार या दोन दीर्घ सुट्टीनंतर रीलिज झाला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत अजय देवगणच्या नेतृत्वाखालील दृश्यम २ आणि ब्रह्मास्त्र सारख्या बड्या चित्रपटांच्या एकूण कलेक्शनला मागे टाकत स्त्री २ ने आता बॉक्स ऑफिसवर रु. २५० कोटी पार केले आहेत. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिक- Sacnilk यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार स्त्री २ ने सोमवारपासून केवळ ३५ टक्के घसरण पाहिली आणि मंगळवारी २५ कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई हृतिक रोशनच्या फायटर आणि प्रभासच्या कल्की 2898 एडीच्या हिंदी आवृत्तीच्या पहिल्या दिवसापेक्षा कित्येकपटीने अधिक आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत चित्रपटाचे एकूण घरगुती कलेक्शन आता रु. २५४.५५ कोटी आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाने ३५० कोटींचा टप्पा पार केला आहे.

३. हॅपी रक्षा बंधन

१९ ऑगस्ट रोजी भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी योग्य वेळ कोणती हे जाणून घेण्यासाठी भारतीयांनी गुगलवर रक्षाबंधन मुहूर्ताचा शोध घेतला. गुगल शोधानुसार, हॅपी रक्षाबंधन आणि रक्षाबंधन २०२४ मुहूर्त आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छांचा मोठ्या प्रमाणावर गुगलवर शोध घेण्यात आला. या सर्च इंजिनाने या विषयावरील शोधात १००० टक्क्यांची वाढ नोंद केली आहे.

४. थार रॉक्स ऑन रोड प्राईस

महिंद्राच्या थार रॉक्सचा देखील गुगलवर सर्वाधिक शोध घेतला गेला. कंपनीने १५ ऑगस्ट रोजी थारची नवीन आवृत्ती असलेल्या थार रॉक्सची किंमत जाहीर केली होती. फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार महिंद्रा थार रॉक्स ही तीन दरवाज्यांच्या थारपेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. महिंद्रा थार रॉक्समध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत. ही गाडी अधिक प्रिमियम आणि अधिक सोयीची आहे. नवीन महिंद्रा थार रॉक्स MX1, MX3, AX3L, MX5, AX5L आणि AX7L या सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. थार रॉक्स ही २.२ लिटर डिझेल इंजिन किंवा २.० लिटर पेट्रोल इंजिनवर चालते, ही मॅन्युअल किंवा स्वयंचलित गिअरबॉक्सशी जोडली गेलेली आहे.

५. ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुगल सर्चवरील ट्रेंडिंग विषयांपैकी एक आहेत. ९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर संतापाचा त्यांना सामना करावा लागत आहे, या लैंगिक अत्याचाराने जगाला हादरून सोडले आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पश्चिम बंगाल सरकारवर या भीषण घटनेबद्दल ताशेरे ओढले, राज्य पोलिसांच्या आणि संस्थेच्या माजी संचालकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि वैद्यकीय व्यावसायिक आणि महिला सुरक्षेशी संबंधित समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी नऊ सदस्यीय पॅनेलची स्थापना केली.

इतर ट्रेंडिंग विषयांची यादी-

६. कपिल सिब्बल
७. मेहंदी डिझाइन
८. भारत बंद २१ ऑगस्ट
९. पायतोंगटार्न शिनावात्रा थायलंड
१०. सरकारी निकाल