Valentine’s Week 2025 Schedule : फेब्रुवारी महिना सुरू होताच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन वीकचे. प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा महिना खूप खास असतो. कारण यानिमित्ताने प्रिय व्यक्तीसमोर आपल्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करता येते. तसेच आधीच जोडीदार असेल तर त्याला व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने चांगले गिफ्ट्स देता येते, फिरायला घेऊन जाता येते. आपल्या प्रेमाच्या नात्यातील आनंद साजरा करता येतो. व्हॅलेंटाईन वीक दरवर्षी ७ फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि १४ फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस हा खास असतो. यंदा तुम्हालाही तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर रोज डेपासून किस डेपर्यंत संपूर्ण दिवसांची यादी जाणून घ्या.
व्हॅलेंटाईन वीक २०२५ ची संपूर्ण यादी (Valentine’s Week calendar 2025)
१) रोज डे (७ फेब्रुवारी २०२५) Rose Day 2025
व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्रेमीयुगल एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपल्या प्रेम भावना व्यक्त करतात. या दिवसापासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. रंगीबेरंगी गुलाबाची फुलं वेगवेगळ्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात.
२) प्रपोज डे (८ फेब्रुवारी २०२५) Propose Day 2025
व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. प्रपोज डे तुम्हाला तुमच्या क्रश किंवा पार्टनरला तुमचे प्रेम प्रपोज करण्याची संधी देतो. या दिवशी लोक आपल्या प्रेयसीला लग्नासाठी किंवा नात्यासाठी प्रपोज करतात.
३) चॉकलेट डे (९ फेब्रुवारी २०२५) Chocolate Day 2025
चॉकलेट डे म्हणजे प्रेमात गोडवा वाढवण्याचा दिवस. प्रपोज डेनंतर तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगल एकमेकांना आनंदाने चॉकलेट बुफे, चॉकलेट बास्केट भेट देतात.
४) टेडी डे (१० फेब्रुवारी २०२५) Teddy day 2025
टेडी डे हा व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस आहे. यावेळी लोक आपल्या जोडीदाराला प्रेमाचं प्रतीक म्हणून आवडत्या रंगाचा टेडी बेअर गिफ्ट देऊन आपल्या भावना व्यक्त करतात.
५) प्रॉमिस डे (११ फेब्रुवारी २०२५) Promise Day 2025
व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करतात. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना आनंदाने एकत्र राहण्याचे वचन देतात.
६) हग डे (१२ फेब्रुवारी २०२५) Hug Day 2025
व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना मिठी मारून प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात.
७) किस डे (१३ फेब्रुवारी २०२५) Kiss Day 2025
व्हॅलेंटाईन वीकचा सातवा दिवस किस डे म्हणून साजरा केला जाणार आहे, जो यंदा १३ फेब्रुवारीला आहे.
८) व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी २०२५) Valentine’s Day 2025 – 14th February
व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी प्रेमी युगल डेट, डिनर प्लॅन करतात. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी ते यापेक्षाही काही खास आणि वेगवेगळे प्लॅन करताना दिसतात.