गुगलने ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक खास डुडल सादर करून भारताच्या संस्कृती आणि वारशाची एक झलक प्रदर्शित केली आहे. २६ जानेवारीच्या दिवशी संपूर्ण जग भारताचा सांस्कृतिक वारसा, सैन्य ताकद आणि विकासाची झलक पाहते आणि ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असते. गुगलने या डूडलला आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये उंट, हत्ती, घोडे, ढोल, तिरंगा इत्यादींचा वापर केला आहे.

गुगलने गेल्यावर्षी ७२व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त डुडलच्या माध्यमातून देशातील अनेक संस्कृतींची झलक सादर केली होती. तसेच, ७१व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगेबिरंगी डुडल सादर केले होते. त्याआधीच्या डुडलमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, विविध कला आणि नृत्यप्रकार देखील पाहायला मिळाले.

local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
Suspicion of explosives in air-conditioned coach of Dakshin Express panic among passengers
दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तीन तास जीव मुठीत… प्रवाशांना अक्षरश: उड्या…
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
jayant patil
Jayant Patil : “राहुल नार्वेकरांनी गरम कॉफी दिली, मासे खाऊ घातले”, जयंत पाटलांनी सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती!

कसा असेल आजचा प्रजासत्ताक दिन?

देशाची राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळेल. यासोबतच भव्य परेडचेही आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नॅशनल वॉर मेमोरियल म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहचून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतील.

एका मिनिटात ‘या’ तरुणाने करून दाखवले असे काही; भल्याभल्यांना फुटेल घाम

१० वाजून २६ मिनिटांनी ध्वजारोहण होईल आणि राष्ट्रगीत म्हटले जाईल. या दरम्यान २१ तोफांची सलामी दिली जाईल. १० वाजून २८ मिनिटांनी राष्ट्रपती सलामी मंचावर जम्मू काश्मीरचे पोलीस एएसआय बाबू राम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करतील. १० वाजून ३० मिनिटांनी वायुसेनेचे चार हेलिकॉप्टर राजपथावरील आकाशात भरारी घेतील. या हेलिकॉप्टर्समधील एकावर भारताचा झेंडा असेल तर उरलेल्या तिघांवर तीन दलांचे (नौदल, वायूदल, लष्कर) झेंडे असतील. हे सर्व हेलिकॉप्टर प्रेक्षकांवर आकाशातून फुलांचा वर्षाव करतील. यासोबतच २६ जानेवारीच्या परेडची सुरुवात होईल. सर्वप्रथम, देशातील परमवीर चक्र विजेते आणि अशोक चक्र विजेते खुल्या जिप्सीमध्ये राजपथवर पोहोचतील आणि राष्ट्रपतींना अभिवादन करतील.

Story img Loader