गुगलने बुधवारी त्यांची ‘इयर इन सर्च २०२१’ (Year in Search 2021) यादी प्रकाशित केली, जी दरवर्षीप्रमाणेच जगभरातून त्याच्या सर्च इंजिनवर सर्वात जास्त काय पाहिले गेले हे दर्शवते. या वर्षभरातील आंतरराष्ट्रीय शोध ट्रेंड प्रदर्शित करणारी एकंदर जागतिक यादी असताना, २०२१ मध्ये इंटरनेटवर तुफान झालेल्या प्रादेशिक ट्रेंडवर प्रकाश टाकणाऱ्या विशिष्ट राष्ट्र-आधारित याद्या देखील आहेत.

भारतातील टॉप तीन सर्च ट्रेंड कोणते?

इंडियन प्रीमियर लीग, CoWIN आणि ICC T20 विश्वचषक – हे सर्व या वर्षातील प्रमुख चर्चेचे मुद्दे होते. देशभरात सर्वाधिक सर्च झालेल्या चित्रपटांमध्ये जय भीम, शेरशाह आणि राधे यांचा समावेश होता.बातम्यांच्या इव्हेंट्सकडे येत असताना, Google सूचीने दाखवले की भारतीयांना टोकियो ऑलिम्पिक, अफगाणिस्तानच्या बातम्या आणि काळ्या बुरशीच्या अपडेट्समध्ये सर्वाधिक रस होता. दरम्यान, नीरज चोप्रा, आर्यन खान आणि शहनाज गिल यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी ठळक बातम्या प्रसिद्ध केल्या आणि अशा प्रकारे या वर्षी गुगलवर सर्वाधिक शोधले गेलेले लोक म्हणून यांची नाव पुढे आली आहेत.

( हे ही वाचा: कुत्र्याची तहान शमवण्यासाठी चिमुरड्याने लावली ताकद, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक )

भारतातील एकूण टॉप ट्रेंड जाणून घ्या:

१. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)

२. कोविन (CoWIN)

३. आयसीसी टी२० विश्वचषक (ICC T20 World Cup)

४. युरो कप (Euro Cup)

५. टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics)

चित्रपटांमधील टॉप ट्रेंड जाणून घ्या:

१. जय भीम (Jai Bhim)

२. शेरशाह (Shershaah)

३. राधे (Radhe)

४. बेल बॉटम (Bell Bottom)

५. इटर्नल (Eternals)

बातम्या इव्हेंटमधील टॉप ट्रेंड जाणून घ्या:

१. टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics)

२. काळी बुरशी (Black Fungus)

३. अफगाणिस्तान बातम्या (Afghanistan news)

४. पश्चिम बंगालच्या निवडणुका (West Bengal elections)

५. ट्रोपीकल चक्रीवादळ Tauktae (Tropical cyclone Tauktae)

कोणत्या व्यक्तींना जास्त शोधलं गेलं?

१. नीरज चोप्रा (Neeraj Chopra)

२. आर्यन खान (Aryan Khan)

३. शहनाज गिल (Shehnaaz Gill)

४. राज कुंद्रा (Raj Kundra)

५. एलन मस्क (Elon Musk)

सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या पाककृती :

१. एनोकी मशरूम (Enoki mushroom)

२. मोदक (Modak)

३. मेथी मटर मलाई (Methi matar malai)

४. पालक (Palak)

५. चिकन सूप (Chicken soup)

दरम्यान, जागतिक शोध ट्रेंडमध्ये ‘ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत’, ‘भारत विरुद्ध इंग्लंड’ आणि ‘आयपीएल’ या वर्षी सर्वाधिक शोधले गेलेले शब्द होते, अगदी ‘एनबीए’ आणि ‘युरो २०२१’ हे सुद्धा यादीमध्ये मध्ये वरती होते.

Story img Loader