गुगलने २०१८ सालामध्ये नेटकऱ्यांनी काय काय सर्च केले या संदर्भातील ‘इयर इन सर्च २०१८ रिपोर्ट’ हा अहवाल नुकताच जाहीर केला. यामध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या आणि ट्रेण्डींग ठरलेल्या नऊ विषयांची यादीच जाहीर करण्यात आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रासंबंधितील यादीमध्ये भारतीयांनी या वर्षी कोणते फोन सर्च केले तसेच कोणत्या गॅजेट्स संदर्भातील माहिती भारतीयांनी सर्वाधिक वेळा शोधली हेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. भारतीयांनी How To हा प्रश्न विचारत सर्वाधिक सर्च केल्याचे गुगलचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अहवालानुसार, भारतीयांनी या वर्षी सर्वाधिक वेळा गुगलवर सर्च केलेला प्रश्न होता, ‘How to send Stickers in WhatsApp’. २५ कोटींहून अधिक व्हॉट्सअप युझर्स असणाऱ्या भारतामध्ये व्हॉट्सअपच्या या नवीन फिचरबद्दल सर्वाधिक उत्सुकता होती हेच गुगलच्या अहवालातून दिसून आले आहे. दिवाळीच्या काही दिवस आधीच व्हॉट्सअपवर स्टीकर्सचे फिचर लॉन्च करण्यात आले. आणि दिवळीच्या शुभेच्छा या अनोख्या माध्यमातून देण्यासाठी भारतीयांनी या स्टीकर्सलाच पसंती दिली. देशातील व्हॉट्सअप वापरणाऱ्यांची संख्या पाहता त्यासंदर्भातील सर्वाधिक सर्च का करण्यात आले हे उघड आहे.

भारतीयांनी How To या कॅटेगरी मध्ये विचारलेला दुसरा सर्वाधिक लोकप्रिय प्रश्न होता, ‘How to link Aadhaar with Mobile number.’ आधार कार्ड क्रमांक मोबाइल क्रमांकाशी संलग्न करणे हे काही महिन्यांपूर्वी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र सर्वोच्च न्यायलयाने आधार कार्डशी संबंधित माहिती खाजगी कंपन्या मागू शकत नाही असा निर्णय दिल्यानंतर ही अट रद्द करण्यात आली. मात्र तोपर्यंत वर्षभरामध्ये भारतीयांनी गुगलवरून आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक कसे संलग्न करुन घ्यायचे याचे उत्तर शोधले.

याशिवाय भारतीयांनी जीओ फोन्सबद्दही गुगलला बरेच प्रश्न विचारले. यामध्ये ‘How to Set Ringtone in Jio Phone’, ‘How to use whatsapp on Jio Phone’, ‘How to send Stickers on WhatsApp in Jio Phone’ या सारख्या प्रश्नांचा समावेश आहे.

याशिवाय भारतीयांना वन प्लस सिक्स या फोनची भूरळ पडल्याचेही गुगल सर्चच्या अहवालामधून दिसून आले. सर्वाधिक ट्रेण्डींग फोन्सच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर वन प्लस सिक्स, दुसऱ्या क्रमांकावर व्हिवो व्ही ९, तिसऱ्या क्रमांकावर रिअलमी २ प्रो, चौथ्या रेडमी नोट फाइव्ह, पाचव्या क्रमांकावर ओप्पो एफ ९ प्रो, सहाव्या क्रमांकावर रेडमी नोट फाइव्ह प्रो, सातव्या क्रमांकावर एमआय ए वन, आठव्या क्रमांकावर रिअलमी टू, नवव्या क्रमांकावर एमआय ए टू तर दहाव्या क्रमांकावर रेडमी नोट सिक्स प्रो या फोनचा समावेश आहे.

स्मार्टफोन वगळता भारतीयांनी वेगवेगळ्या गॅजेट्सबद्दलही गुगलवर बरीच माहिती सर्च केली. भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या गॅजेट्सची यादी पुढील प्रमाणे (अनुक्रमे): गुगल होम, गोप्रो हिरो, अॅपल एअरपॉड्स, अॅपल वॉच सिरीज फोर, फिटबीट व्हर्सा, सोनी ए सेव्हन ट्रीपल आय कॅमेरा, जबरा एलिट ६५ टी, बोस साऊण्डसपोर्ट फ्री, गोप्रो फ्युजन, अॅमेझॉन इको स्पॉट.

तसेच गुगलच्या निअर मी या सर्चमध्ये मागील यंदा मोबाइल स्टोर्स निअर मी हा सर्वाधिक शोधलेला ट्रेण्ड होता. या ट्रेण्डने ‘सुपरमार्केट निअर मी’ आणि ‘गॅस स्टेशन निअर मी’ या दोन्ही ट्रेण्डला मागे टाकले.