सोशल मीडीया हे कंटेंटचं आणि माहितीचं भंडार आहे. येथे तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती आणि कन्टेट मिळतील. म्हणूनच तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोक सोशल मीडियावर आपला वेळ घालवतात. येथे लोकांना वेळ कसा निघून जातो हे त्यांचं त्यांनाच समजत नाही. पण हे मात्र नक्की आहे की, येथे लोकांचं मनोरंजन होतं. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल. या व्हिडीओमध्ये गोरिला सायकल चालवता चालवता धापकन खाली पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गोरिला आपल्याच धुंदीत सायकल चालवताना दिसत आहे तर दुसरा उन्हात बसून आराम करताना दिसत आहेत. सायकल चालवत असताना या गोरिलाचा आनंद गगनात मावेनासा होतो. मोठ्या ऐटीत तो सायकलवर बसून दुसऱ्या गोरिलाच्या बाजूने जातच होता, तितक्यात त्याच्या आनंदावर पाणी फेरलं. सायकल चालवता चालवता त्याचा तोल गेला आणि धापकन खाली पडला. त्याची सायकलही दुसऱ्या बाजुला जाऊन पडली. मग काय या गोरिलाला इतका राग आला की त्याने पुढे जे केलं ते पाहणं खरं तर फार मजेदार आहे.

सायकलवरून पडल्यानंतर हा गोरिला रागाने इतका लालेलाल झाला की थेट त्याने सायकलच उचलून फेकली. त्यावेळी या गोरिलाचे एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे आहेत. सायकलवरून पडलो म्हणून सायकलच उचलून फेकली हे पाहून गोरिलावर हसू येतं. हा व्हिडीओ IFS अधिकारी सम्राट गौडा यांनी बुधवारी ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. ‘स्टूपीड सायकल’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : मून वॉक करताना अंतराळवीर धाडकन कोसळला, या मजेदार क्षणाचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : निर्दयी आई! गृहपाठ केला नाही म्हणून हात पाय बांधून तळपत्या छतावर झोपवलं

हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. इतका की आतापर्यंत या व्हिडीओला ५८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवरील प्रतिक्रिया देखील वाचण्यासारख्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gorilla falls down after riding bicycle hilarious viral video shows what happened next prp