Influencers Chya Jagat Goshta Kokanatli Exclusive: लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरजच्या १८ व्या भागात आपण कोकणकरांचा लाडका अनिकेत रासम याच्या कुटुंबाशी गप्पा मारणार आहोत. नोकरी सोडून ‘गोष्ट कोकणातली’ची निर्मिती करताना नेमका काय विचार मनात होता? गावाला स्थायिक होण्यासाठी बायकोने कशी साथ दिली? शूटिंग करताना आईची कशी तयारी होते? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनिकेतने आपल्या खास सत्रात दिली आहेत. शेतीमध्ये विविध प्रयोग करून पाहताना कधी फायदा कधी नुकसान सहन करतही अनिकेतने घेतलेला धडा सर्वांनीच शिकण्यासारखा आहे. अनिकेत सांगतो की, “कोणतीच गोष्ट एका रात्रीत होत नाही. आज शेतीत बियाणे पेरलं, उद्या पीक आलं, परवा नफा झाला असं कोणतंही गणित नसतं. तसंच युट्युबचं सुद्धा आहे तुम्ही दिवसभर व्हिडीओसाठी मेहनत घेता आणि मग नंतर लोकांना काय आवडतं यानुसार आपल्याला घडत जायचं असतं. मेहनतीला पर्याय नाही”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे, युट्युबचा प्रवास सुरु करताना शंका मनात असून लेकाच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या अनिकेतच्या बाबांचं बोलणं तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. नोकरी सोडून गावी गेल्यावर आईबरोबर केलेला व्हिडीओ जेव्हा हिट झाला आणि चॅनेलचं मॉनिटायजेशन सुरु झालं तेव्हा मनात काय भावना होत्या हे ऐकून तुमचेही डोळे पाणावतील. कुटुंबासह व्हिडीओ बनवणात युट्युबवर कुटुंब तयार केलेल्या अनिकेतची ही मुलाखत नात्याची घडी कशी जपावी याचं गाईडबुक ठरते, त्यामुळे हा व्हिडीओ संपूर्ण पाहा.

Video: गोष्ट कोकणातली मुलाखत

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा, तसेच पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या इन्फ्लूएंसरला भेटण्याची इच्छा आहे हे सुद्धा नक्की सांगा .

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta kokanatli youtube channel interview with loksatta aniket rasam shares success mantra how youtube channel got monetized svs
Show comments