हाताला खाज सुटणे आणि डोळ्यांची फडफड होण्याचे फायदे आणि तोटे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. याबाबत अनेकदा वयस्कर लोक बोलत असतात, पण कधी हाताला खाज सुटल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे नशीब खरोखर पालटून गेल्याचे तुम्ही ऐकले आहे का? नसेल तर मग आता तुम्हाला तेही ऐकायला मिळणार आहे. कारण सध्या असे एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका तरुणाच्या हाताला खाज सुटल्यामुळे तो क्षणात करोडपती झाला आहे. तर या घटनेतील तरुण नेमका कसा करोडपती झाला ते जाणून घेऊया.
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणाऱ्या एका महिलेला हाताला खाज सुटल्यामुळे आर्थिक फायदा होतो याची चांगलीच खात्री पटली आहे. कारण ऑफिसला निघालेला तिचा मुलगा करोडपती बनूनच घरी परतला आहे. करोडपती झालेल्या मुलाचे नाव डोनल्ड पिटमैन असं आहे. याबाबतचे वृत्त जनसत्ताने दिलं आहे.
डोनल्ड पिटमैन म्हणाला की, त्याची आई त्याला नेहमी म्हणायची “जर तुझा हाताला खाज सुटत असेल तर ते खिशात घाल, तसं केल्याने तुझाकडे पैसे येतील.” पिटमैन सांगितले की, तो ऑफिसला जात होता, यावेळी त्याच्या हाताला खाज येऊ लागली, म्हणून त्याने त्याने आपले हात खिशात घातले आणि एका दुकानात जाऊन लॉटरीचे तिकीट खरेदी केले. मात्र, माझा लॉटरीचे तिकीट खरेदी करण्याचा हेतू नव्हता, परंतु जेव्हा हाताला खाज सुटू लागली तेव्हा मी ते खरेदी करण्याचा निर्णय घेतला असंही पिटमैनने सांगितलं.
पिटमैनने जेव्हा लॉटरीचे तिकीट स्क्रॅच केले तेव्हा त्याचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण त्याला लॉटरी लागली होती आणि तो करोडपती झाला होता. शिवाय त्याने एक दोन लाखाची नव्हे तर तब्बल दीडकोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची लॉटरी जिंकली होती. पिटमैन म्हणाला, “जेव्हा लॉटरीच्या बक्षिसाची रक्कम पाहिली तेव्हा त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.”
लॉटरी लागल्यानंतर तो म्हणाला, “आई नेहमी म्हणायची की हाताला खाज सुटत असताना खिशात ठेवल्यास भरपूर पैसे मिळतात. आता मलाही याची खात्री पटली आहे.” शिवाय हाताला खाज सुटल्याच्या निमित्ताने तर एका क्षणात करोडपती झालेल्या पीटमैनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.