Govardhan puja 2024 Date: पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गोवर्धन पूजा साजरी केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा साजरी करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासीयांचे आणि तेथील प्राण्यांचे भगवान इंद्राच्या कोपापासून संरक्षण केले होते. त्यामुळे हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला धान्यापासून बनविलेले अन्न अर्पण करण्याचीही परंपरा आहे. तसेच गाई आणि बैलांचीही या दिवशी पूजा केली जाते. गूगल ट्रेंडवरही आज गोवर्धन पूजा कीवर्ड खूप चर्चेत आला आहे.

पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी सुरू झाली असून, ती २ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार, यंदा गोवर्धन पूजा २ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.

Gani Bavari Viral Video
‘डान्स असावा तर असा…’ ‘घनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
video of school students hugging each other in classroom went viral on social Media obscene video viral
भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त

गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी ३ वाजून २३ मिनिटांपासून ते ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत आहे. या काळात पूजा करणे शुभ मानले जाईल.

हेही वाचा: Diwali Padwa 2024 : पाडव्याच्या दिवशी पतीचे औक्षण का केले जाते? जाणून घ्या पाडव्याचा शुभ मूहूर्त आणि पौराणिक कथा

गोवर्धन पूजा विधी

गोवर्धन पूजेसाठी घराच्या अंगणात शेणाने गोवर्धनाचा आकार काढला जातो. त्यासह गाय आणि बैलाच्या लहान आकृत्या बनवल्या जातात. त्यानंतर पूजेमध्ये कुंकू, तांदूळ, बत्तासे, पान, खीर, पाणी, दूध, फुलं इत्यादी अर्पण केले जाते. त्यानंतर धूप-दीप दाखवून भगवान गोवर्धनाला प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर आरती करून, नैवेद्य दाखवला जातो आणि तोच नंतर प्रसाद म्हणून वाटला जातो.

सौजन्य: गुगल ट्रेंड

वर दिलेल्या गूगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, कालपासून दहा हजारांपेक्षा अधिक युजर्सनी गोवर्धन पूजा २०२४ हा कीवर्ड सर्च केला आहे.

Story img Loader