Government Teacher Wrote Wrong Spelling Of January : इंग्रजी ही जगभरात वापरली जाणारी भाषा असल्याने हल्ली पालक आपल्या मुलांना थेट इंग्रजी शाळेत शिकायला पाठवीत आहेत. युरोप, अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये प्रवास करताना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे असते. त्यामुळे परदेशांत जाणारे अनेक भारतीय आपली इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. काही शाळांतील शिक्षकही विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.

पण, सर्वच शाळांमध्ये इंग्रजी उत्तम शिकवता येणारे शिक्षक असतीलच, असे सांगता येत नाही. काही शाळांमध्ये तर शिक्षकांना इंग्रजी नीट वाचताही येत नाही, अशी परिस्थिती आहे. परिणामी अशा शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना चुकीचे इंग्रजी शिकवले जाते. सध्या अशाच एका शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिला फळ्यावर जानेवारी हा शब्द इंग्रजीमध्ये लिहिता आला नाही. तिने जानेवारीच्या जागी जो काही शब्द लिहिला तो पाहून ब्रिटिशही लाजतील. तिने नेमका कोणता शब्द लिहिला हे तुम्हीच व्हिडीओमध्ये पाहा.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

व्हिडीओमध्ये इन्स्पेक्शनसाठी आलेला अधिकारी एका महिला शिक्षिकेला फळ्यावर जानेवारी हा शब्द इंग्रजीमध्ये लिहिण्यास सांगताना दिसतेय. त्यानंतर तिने ज्या प्रकारे हा शब्द लिहिला ते पाहून बाजूला उभे असलेला अधिकारीही चक्रावला.

factszonee या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ही महिला शिक्षिका एका सरकारी शाळेत कार्यरत आहे. दरम्यान, इन्स्पेक्शनसाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्याने महिलेला फळ्यावर जानेवारी हा शब्द इंग्रजीत लिहिण्यास सांगितला. पण, तिला त्या शब्दाचे स्पेलिंग नीट लिहिता आले नाही म्हणून तिने इंग्रजीच्या जागी JUNGU (जुंगू) असे लिहिले. आता अशा शिक्षकांना दरमहा ५५ हजार रुपये वेतन का द्यायचे, असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.

शिक्षिकेच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर युजर्स आता भरभरून कमेंट्स करीत आहेत. एका युजरने मजेशीर कमेंट करीत लिहिले की, प्रश्नच चुकीचा होता. तुम्ही त्यांना जुगनूची स्पेलिंग लिहिण्यास सांगितली असती, तर त्यांनी जानेवारीची स्पेलिंग नीट लिहिली असती. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, आम्ही खासगी शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आपले आरोग्य, वेळ व सर्व काही पणाला लावले आहे. पण, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सरकारी शाळेतील शिक्षकांच्या शिकवणीबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Story img Loader