सुषमा स्वराज यांचा हजरजबाबीपणा एव्हाना सगळ्याच नेटीझन्सना माहिती झाला आहे. ट्विटवर त्यांना प्रश्न विचारणा-या किंवा मदतीची याचना करणा-या सगळ्यांनाच स्वराज लगेच उत्तर देतात. त्यामुळे नेटीझन्समध्ये मोदी सरकारमधल्या या मंत्री जास्तच प्रसिद्ध आहे. अशी उदाहरणे अनेकवेळा आपण वाचली असतील. आता मात्र ट्विटरवर त्यांना एकाने असा प्रश्न विचारला की त्याचे उत्तर सुषमा यांनी नाही तर त्यांच्या पतीने दिले. ‘ट्विटरवर एकाने स्वराज यांना तुम्ही ट्विटरवर आपल्या पतीला फॉलो का करत नाही ?’ असा प्रश्न विचारला होता. वास्तविक ट्विटरवर सुषमा यांचे पती कौशल हे त्यांना फॉलो करतात पण स्वराज मात्र त्यांना फॉलो करत नाही त्यामुळे उत्सुकतेपोटी त्याने हा प्रश्न त्यांना विचारला होता. यावर सुषमा यांनी काहीच उत्तर दिले नाही पण त्यांच्या पतीने मात्र मिश्किलेने या प्रश्नाचे उत्तर दिले. आणि हे उत्तर सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.
‘गेल्या ४५ वर्षांपासून मला सुषमा यांना फॉलो करायची सवय लागली आहे. आता ही सवय बदलू शकत नाही’ असे विनोदी उत्तर त्यांनी प्रश्न विचारणा-याला दिले. कौशल स्वराज यांचे हे उत्तर नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पतीसोबतचा जुना फोटो टाकला होता. संसदेच्या बाहेर देखील पतीसोबत भेट झाली असतानाचा आणखी एक फोटो स्वराज यांनी ट्विट केला होता. त्यामुळे नेटीझन्सना या स्वराज जोडप्यांविषयी जास्तच उत्सुकता आहे.

swaraj-kaushal-tweet