State Bank of India fraud: एकीकडे ऑनलाइन गोष्टींमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे सायबर क्राइमच्या संख्येतही वाढ झाली आहे. इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे सुविधा तर वाढल्याच आहेत, पण दुसरीकडे त्याचे दुष्परिणामदेखील पाहायला मिळत आहेत. गेल्या काही काळात ऑनलाइन फ्रॉड्सच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. हॅकर्सदेखील इंटरनेट युजर्सच्या डिव्हाइसेसमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रवेश मिळवून त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत. या स्कॅम्समुळेदेखील अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशात सावधगिरी न बाळगल्यास एका क्लिकवर तुमचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. नुकतेच एसबीआयने अशाच एका मेसेजबाबत ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना एसबीआय रिवॉर्ड पॉइंट्सबाबत फसव्या एसएमएस आणि व्हॉट्सॲप मेसेजबद्दल इशारा दिला आहे. सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत एसबीआयने वापरकर्त्यांना रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी संदेश पाठवणाऱ्या स्कॅमर्सबद्दल सतर्क केले आहे. एसबीआयने स्पष्ट केले की ते असे संदेश कधीही पाठवत नाहीत आणि ग्राहकांना या संशयास्पद संदेशांमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

एसबीआय आपल्या ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी रिवॉर्ड पॉइंट ऑफर करते. प्रत्येक पॉइंटचे मूल्य २५ पैसे आहे. या रिवॉर्ड पॉइंट्सचा उपयोग वस्तू, चित्रपटाची तिकिटे, मोबाइल/डीटीएच रिचार्ज, एअरलाइन तिकिटे, हॉटेल बुकिंग आणि बरेच काही यांसारखी उत्पादने आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र, कोणतीही रक्कम एसबीआय बँक देत नाही.

एसबीआय बँकधारकांना काय मेसेज येतोय?

एसबीआयच्या पोस्टनुसार, व्हॉट्सॲपवर आणि एसएमएसद्वारे येणाऱ्या बनावट मेसेजमध्ये लिहिले आहे की, “प्रिय ग्राहक- Yono SBI नेट बँकिंग रिवॉर्ड पॉइंट INR Rs.९८९५ आज एक्स्पायरी डॉक्युमेंट्स तुमची कॅश रिडीम करा लिंक -nct.short.gv/Me वर क्लिक करा.” मात्र, लक्षात ठेवा या लिंकवर क्लिक करताच ती लिंक तुम्हाला तुमचे डिटेल्स विचारणाऱ्या बनावट SBI वेबपेजवर घेऊन जाईल आणि हॅकर मिनिटांत तुमचे अकाउंट रिकामे करेल.

“SBI ग्राहकांनो लक्ष द्या: फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा.

एसबीआय बँकेतर्फे बँकधारकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. एसबीआय रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी फसवणूक करणारे एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज आणि एपीके पाठवत असल्याचे आढळून आले आहे. कृपया लक्षात ठेवा की, एसबीआय असे संदेश आणि SMS किंवा WhatsApp वर कधीही शेअर करत नाही. अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा अज्ञात फाइल्स डाउनलोड करू नका. सुरक्षित राहा.”

पाहा ट्विट

हेही वाचा >> Shocking Video: नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद

एसबीआय खातेधारकांच्या रिवॉर्ड पॉईंटशी फेरफार करत खातेधारकांना सायबर हल्ल्यांचे शिकार करणारी अनेक मंडळी सध्या सक्रिय असल्यामुळे खातेधारकांच्या हितासाठी सरकार आणि बँकेने ही पावलं उचलली आहेत; त्यामुळे असा कोणताही मेसेज मिळाल्यास खातेधारकांनी एसबीआय बँक किंवा थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Story img Loader