रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा ऑटोरिक्षावर, टॅक्सी किंवा बाईक्सच्या मागे काही भन्नाट कोट्स लिहिलेले असतात, जे वाचून अनेकदा खूप हसायला येते. तसेच प्रश्नही पडतो की, या लोकांना एवढं भन्नाट लिहायला सुचत कसं… सध्या असाच एका रिक्षामध्ये लावलेल्या कोट्सचा फोटो व्हायरल होत आहे.
भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे पण केवळ भांडवल नसल्यामुळे त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहतं. मात्र म्हणतात ना एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर ती शक्य होतेच. असाच एक रिक्षा चालक त्याचं हे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत आहे. याचसाठी त्यानं असं डोकं लावलंय की तुम्हीही त्याचं कौतुक कराल. अलीकडे, सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बेंगळुरूमधील एक ऑटो ड्रायव्हर लोकांना त्याच्या स्टार्टअपसाठी निधीसाठी आवाहन करत आहे. यासाठी ड्रायव्हरने त्याच्या ऑटोच्या आत एक पोस्टर देखील चिकटवले आहे जे खूपच मजेदार आहे आणि इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. खरं तर, Reddit वर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बेंगळुरूमधील एक ऑटो ड्रायव्हर स्टार्टअपसाठी प्रवाशांना भांडवल देण्यासाठी आवाहन करत आहे. सॅम्युअल क्रिस्टी असे ऑटोचालकाचे नाव असून तो एक शिक्षित पदवीधर ऑटो चालक आहे.
अशा परिस्थितीत सॅम्युअलला स्वत:साठी एक स्टार्टअप उघडायचा आहे. त्याच्या रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांचे लक्ष आधी ऑटोमधील पोस्टरकडे जाते ज्यामध्ये फंडाशी संबंधित सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत. हे पोस्टर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरवर ..”हॅलो पॅसेंजर, माझे नाव सॅम्युअल क्रिस्टी आहे आणि मी पदवीधर आहे. मला एक स्टार्टअप उघडायचा आहे. ज्यासाठी मी निधी गोळा करत आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कृपया माझ्याशी बोला.” ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच यूजर्सने कमेंट करायला सुरुवात केली आहे. हे पोस्टर पाहून तुम्हालाही कळेल इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य आहे.
पाहा पोस्ट
हेही वाचा >> काय गरज होती का? मुलीला इंप्रेस करण्यासाठी स्टेजवर गेला अन् झाला मोठा पचका; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
ही पोस्ट बेंगलुरु मोमेंट नावाच्या Reddit खात्यावरून शेअर केली गेली आहे, जी आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिली आहे. पोस्ट वाचल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…”मला ही पद्धत आवडली. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… “मला निधी द्यायचा आहे, पण अडचण अशी आहे की मी हिंदीत बोलतो.” तर दुसऱ्या युजरने लिहिले…”जा मित्रा, आधी हिंदी शिका, मग बोलू.