Rickey Kej Shares Bad Experience At Mumbai Hotel : ग्रॅमी अवॉर्ड विजेता रिकी केज नुकतेच मुंबई विमानतळावरील एका बजेट हॉटेलमध्ये मुक्कामास होते. पण, हॉटेलमध्ये राहताना त्यांना अतिशय वाईट अनुभवांचा सामना करावा लागला, ज्याविषयी रिकी केज यांनी शुक्रवारी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एकामागोमाग एक अनेक पोस्ट करून माहिती दिली आहे. हॉटेल रुममधील झुरळांचा वावर, तुटलेले नळ, लाँड्री पिकअपची नसलेली सुविधा, गलिच्छ टॉयलेट यांसह अनेक मुद्द्यांवरून हॉटेलच्या सेवा-सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुंबई विमानतळावरील टाटा कंपनीच्या स्टेजिंजर हॉटेलमध्ये मुक्कामास असताना त्यांना अशा वाईट अनुभवांचा सामना करावा लागला.

“मी टाटांचा मोठा चाहता, पण…”

रिकी केज यांनी एक्सवर पहिली पोस्ट करत लिहिले की, मी सध्या मुंबई एअरपोर्टवरील जिंजर हॉटेलमध्ये मुक्कामास आहे. टाटा कंपनीच्या नो फ्रिल्स बिझनेस हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव चांगला असेल असे मला वाटले. मी टाटांचा मोठा चाहता आहे, पण यापूर्वीही मला असा वाईट अनुभव आला होता. तरीही मी दुसरी संधी देण्याचा निर्णय घेता, पण दुर्दैवाने काउंटरवरील चेकिंगपासून अप्रशिक्षित कर्मचारी, रुममध्ये झुरळ, खराब प्लम्पिंग, लाँड्री पिकअपची नसलेली सुविधा, गलिच्छ टॉयलेट ड्रेन अशा अनुभवांचा सामना करावा लागला. पण, मला आशा आहे की कंपनी यात आपल्या ग्रुपच्या फायद्यासाठी सुधारणा करेल.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

“पाहा हॉटेलमधील माझ्या रूममध्ये आनंदात भटकणारे एक झुरळ”

त्यानंतरच्या त्यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये रूममध्ये असताना वावरणाऱ्या झुरळांचा व्हिडीओ पोस्ट केलाय. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, पाहा मुंबई विमानतळावरील हॉटेलमधील माझ्या रूममध्ये आनंदात भटकणारे एक झुरळ. यावर पुढे त्यांनी लिहिले की, मला हॉटेल कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले की, ही एकच रूम आता राहिली आहे.

रिकी केज यांचा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांवर असभ्यतेचा आरोप

इतकेच नाही तर रिकी केज यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांवर असभ्य असल्याचा आरोप करत आणखी एक पोस्ट केली, ज्यात त्यांनी लिहिले की, “माझ्या ट्विटनंतर @stayatginger च्या लोकांनी माझी चावी निष्क्रिय केली आहे. उद्धटपणा, धमक्या देणारी सेवा, असभ्यता… आणि आता सूड. मुंबई विमानतळावरील जिंजर हॉटेलमध्ये मोठी सांस्कृतिक समस्या असल्याचे दिसून येत आहे. @TataCompanies कृपया लक्ष द्या.

रिकी केज यांनी टाटा कंपनीला दिला ‘असा’ सल्ला

आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, काल दुपारी २ वाजता कपडे लाँड्रीमध्ये टाकण्यासाठी कॉल केला, पण कोणीही माझ्या रूममध्ये आले नाही. मी ४५ मिनिटे वाट बघत थांबलो, पण माझे कपडे लाँड्रीत टाकण्याचे काम झाले नाही! @stayatginger आणि @TataCompanies तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी म्हणून कृपया कर्मचाऱ्यांची चौकशी करा, CCTV फुटेज पाहा आणि कृपया ऑपरेशन, कार्यक्षमता आणि सेवेत यातील त्रुटी कशा घडत आहेत ते शोधा. कोण जबाबदार आहे आणि या ब्रँडवरील ग्राहकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे ते पाहा.

रिकी केज यांच्या पोस्टनंतर हॉटेलने मागितली माफी

रिकी केजच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, @stayatginger हॉटेलच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून प्रतिसाद देत त्याच्या झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागण्यात आली. स्टेजिंजग हॉटेलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, प्रिय रिकी, तुमच्या हॉटेलमधील मुक्कामादरम्यान झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही तुमची मनापासून माफी मागतो. आम्ही या प्रकरणाचा तातडीने तपास करत आहोत. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी अमूल्य आहे, आमच्या टीममधील एक सदस्य लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.

रिकी केज हे प्रसिद्ध संगीतकार आहेत, ज्यांनी तीन वेळा ग्रॅमी अवॉर्ड जिंकण्याचा मान मिळवला आहे. २०१५ आणि २०२२ मध्ये बेस्ट न्यू एज अल्बम श्रेणीमध्ये पहिले दोन ग्रॅमी अवॉर्ड त्यांनी जिंकले. तर गेल्या वर्षी त्यांच्या ‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बमला ‘बेस्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम’ हा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. रॉक-लेजेंड स्टीवर्ट कोपलँड यांच्यासह मिळून त्यांनी या अल्बमची निर्मिती केली होती.

Story img Loader