Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रिल्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला, तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होत असतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकतंच काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा : द रुल’ या आगामी चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं; या गाण्यातील हुक स्टेपची अनेकांना भुरळ पडली. या गाण्यावर लाखो लोक रिल्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज कलाकारांनीही या गाण्यावर रिल्स तयार केल्या आहेत. हे गाणं अजूनही खूप चर्चेत आहे. अशातच आता या चित्रपटातील दुसरं गाणंदेखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं. सूसेकी असं या गाण्याचं नाव असून या गाण्यावरदेखील अनेकजण रिल्स बनवताना दिसत आहेत.
‘पुष्पा : द रुल’ चित्रपटाच्या पहिल्या भागामधील गाण्यांनीदेखील अनेकांना वेड लावलं होतं. या गाण्यांतील अनेक हुक स्टेप्सदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. दरम्यान, आता ‘पुष्पा : द रुल’ चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘सूसेकी’ गाण्यातील एक हुक स्टेप सध्या खूप व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्येही ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आजीबाई डान्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आजीबाई सुरुवातीला सूसेकी गाण्यातील हुक स्टेप अगदी हुबेहूब करताना दिसत आहेत. पुढे त्यांच्यासोबत एक तरुणदेखील डान्स करताना दिसत आहे. यावेळी आजींच्या चेहऱ्यावर खूप सुंदर हावभाव पाहायला मिळत आहेत. या वेळी आजींनी लाल रंगाची साडी नेसली होती. सध्या आजींचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @akshay_partha या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “आजीबाई खूप पाॅवरफूल आहेत.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप छान आजी आहेत.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “या वयातही आजी खूप स्ट्राँग आहेत.”