ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. तर या सोशल मीडियावर आजी-आजोबांचेही अनेक रोमँटिक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये उतारवयात आजोबांचं प्रेम उफाळून आलं आहे. या आजोबांनी काया केलं हे पाहून तुम्हीही अवाक व्हाल…
मुगल बादशाह शहाजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात हा ताजमहाल बांधला. ताजमहाल जगानं पाहिलाय पण जिच्यासाठी बांधला तिनंच पाहिला नाही. यावरुन आपण बोध घेतो की, आपल्याजवळ जोपर्यंत एखादी व्यक्ती आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा. एकदा का ते गेले की पुन्हा ते येत नाहीत. आजोबांनीही अगदी हेच केलं. या आजोबांनी आपल्या पत्नीला चक्क व्हिलचेअरवर का होईना पण घेऊन ताजमहाल दाखवायला घेऊन आले. आजी-आजोबाच्या या प्रेमाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.त्यांच्या पत्नीला चालता येत नाहीये तरीही ते ताजमहाल दाखवायला व्हिलचेअरवर पत्नीला घेऊन आले आहेत. वृद्ध कपलच्या प्रेमाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल असा हा व्हिडीओ आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> लेकीला पहिल्यांदा वर्दीमध्ये पाहून आईच्या अश्रूंचा बांध फुटला; भावनीक Video व्हायरल
आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते आपल्यामधील प्रेमाने अजून सुंदर होतं. प्रेमाचे रंग वेगवेगळे असतात ते कधी शब्दांनी तर कधी स्पर्शांनी तर कधी छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांना सांगितले जातात. म्हणतात उतारवयात खरी प्रेमाची परिभाषा कळते. त्यावेळी आपल्याला आपल्या जोडीदाराची खास गरज असते. उतारवयातील प्रेम हे खऱ्या अर्थाने निस्वार्थ, सुंदर आणि परीपूर्ण असतं. या व्हिडीओमधील आजोबांनी समाजाची काळजी न करता आजीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं…