ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. तर या सोशल मीडियावर आजी-आजोबांचेही अनेक रोमँटिक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये उतारवयात आजोबांचं प्रेम उफाळून आलं आहे. त्यांनी रस्त्यातच आपल्या बायकोला असं काही दिलं की ते गिफ्ट पाहून आजीलाही धक्का बसला.

गिफ्ट पाहून आजीलाही बसला आश्चर्याचा धक्का

आजी-आजोबाच्या या प्रेमाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता लोक आपल्या पार्टनरला काय काय गिफ्ट देतात. कुणी अंगठी, कुणी आयफोन, कुणी कार… पण हे असे सर्व हजारो-लाखो रुपयांचे गिफ्ट या गिफ्टसमोर काहीच नाही, असंच तुम्हालाही वाटेल. वृद्ध कपलच्या प्रेमाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल असा हा व्हिडीओ आहे.

काय आहे गिफ्ट?

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक वृद्ध दाम्पत्य दिसतं आहे. आजोबा आपल्या खिशातून काहीतरी काढतात आणि ते त्या आजीला देतात. आजी जेव्हा ते पाहते तेव्हा तिला ही धक्का बसतो. आजोबांच्या हातातील ती वस्तू पाहून आजीलाही विश्वास बसत नाही. ती त्या वस्तूकडे पाहतच राहते. आजोबांनी आणलेलं ते गिफ्ट पाहून आजी लाजते. पतीचं असं प्रेम पाहून क्षणभर ती भावुक होते. पण तिला इतका आनंद होतो की ती आजोबांना मिठीच मारते. आजोबांनी आजीला दिलेलं हे गिफ्ट. जे दुसरं तिसरं काही नाही तर एक टिकलीचं पाकीट आहे. त्या पाकिटावरील टिकली काढून आजोबा स्वतःच्या हाताने आपल्या बायकोच्या कपाळावर लावतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नवरा असावा तर असा! चक्क चंद्रावरच दिलं बायकोला ‘हे’ भन्नाट गिफ्ट, चांद्रयान-३ च्या लँडिंगनंतर नेमकं काय घडलं?

आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते आपल्यामधील प्रेमाने अजून सुंदर होतं. प्रेमाचे रंग वेगवेगळे असतात ते कधी शब्दांनी तर कधी स्पर्शांनी तर कधी छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांना सांगितले जातात. म्हणतात उतारवयात खरी प्रेमाची परिभाषा कळते. त्यावेळी आपल्याला आपल्या जोडीदाराची खास गरज असते. उतारवयातील प्रेम हे खऱ्या अर्थाने निस्वार्थ, सुंदर आणि परीपूर्ण असतं. या व्हिडीओमधील आजोबांनी समाजाची काळजी न करता आजीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं…

Story img Loader