Viral video: ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. तर या सोशल मीडियावर आजी-आजोबांचेही अनेक रोमँटिक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात.

आजच्या काळात प्रेम व्यक्त करणं ही सामान्य गोष्ट झालीये. हल्ली जगासमोर लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा प्रेम व्यक्त करायला लोकं घाबरायचे. अशाच एका आजी-आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये या आजीनं वयाच्या शेवटच्या टप्प्यात का असेना पण आजोबांना प्रपोज केलच. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.उतारवयात आजी-आजोबांचं प्रेम उफाळून आलं आहे. यावेळी एका व्हिडीओतून आजी – आजोबांचे खरं प्रेम हे जगासमोर आलं आहे.

Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Viral Video of old leady enjoying zipline ride were nauvari sadi
हौसेला वयाचे बंधन नाही! कशालाही न घाबरता आजीबाईंनी लुटला झीपलाईनचा आनंद, पाहा Viral Video

आजकालचा जमाना हा डिजिटल रिलेशनशिप्सचा आहे. परंतु जेव्हा हा डिजिटलचा जमाना नव्हता तेव्हा मात्र प्रेमाची परिभाषाचं ही वेगळी होती. डोळ्यातलं प्रेम, पत्रातून लिहिलेल्या भावना, नात्यातला आगळा गोडवा इत्यादी. आता मात्र डेटिंग अॅप्स, चॅटिंग, पॉर्न अशा अनेक गोष्टींमुळे नाती आणि प्रेम यांच्या परिभाषा कैक पुढे गेल्या आहेत. बदलल्या आहेत. परंतु जुन्या काळातील प्रेम हे आजच्या काळातही भक्कमपणे टिकून आहे आणि रूजलेलं आहे. आजही तरूणपिढीला यातून प्रेरणा मिळते आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा खुर्चीत बसलेले आहेत आणि तिथेच त्यांची पत्नी उभी आहे. यावेळी एक तरुण या आजींना आजोबांना प्रपोज करायला शिकवत आहेत. मग काय आजीनंही गुडघ्यावर बसून आजोबांना आय लव्ह यू म्हणत प्रपोज केलं.त्यानंतर आजोबाही काही कमी नाहीत आजोबांनीही माईक हातात घेत आजीला आय लव्ह यू म्हणत प्रपोज केला. यावेळी आजी अशा लाजल्या की सगळेच हसू लागले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईकरांनो सावध राहा! पावसामुळे भलामोठा प्राणी फिरतोय रस्त्यांवर, व्हायरल VIDEO पाहून व्हाल थक्क

सोशल मीडियावर हा व्हिडीओ actor_om_yadav_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. प्रेमाला वय नसतं असं कॅप्शनही व्हिडीओला दिलं आहे.

Story img Loader