Viral video: रोजचं आयुष्य आता भरधाव वेगाचं आहे. त्यात पळभर थांबून विश्रांती घेणं, स्वत:शी संवाद साधणं कठीणच. पण आयुष्य जगताना अनेक अडचणी, अनेक आव्हानं कमी-अधिक गंभीरपणे समोर ठाकतच असतात. पण काही वेळा आयुष्य तिथंच थांबतं, साचून राहातं. अशा वेळी त्यातून बाहेर कसं पडायचं, हा यक्षप्रश्न निर्माण होतो. पण त्याही प्रश्नाचं उत्तर मिळवता येतं, एक भलं मोठं वळण घेऊन, एक यू-टर्न घेऊन! आयुष्यातला हा यू-टर्न प्रत्येकाचं आयुष्य घडवत आलाय, बदलवत आलाय, यशस्वीपणे मुक्कामापर्यंत पोहोचवत आलाय. आयुष्य जगण्यासाठी संघर्ष हा करावाचा लागतो. आयुष्याच्या प्रवासात अनेक वळणे येतात, अनेक चढ-उतारही येतात. इतके संघर्ष, चढ-उतरांसह आयुष्य जगायचे तरी कसे असा प्रश्न अनेकांना पडत असतो. या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हाला तेच सांगू शकतात ज्याने आयुष्याचे अनेक उन्हाळे -पावसाळे पाहिले आहे, ज्यांनी आयुष्यात संघर्ष केला आहे. असा आयुष्य जगण्याचा अनुभव असलेल्या एका आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ आहे खास करुन महिला त्या महिसांसाठी ज्या स्वत:कडे लक्ष न देता कुटुंबासाठी, इतरांसाठी स्वत:ला झोकून देतात. मात्र हॉस्पिटलच्या बेडवर असलेल्या या आजीला पाहून कळेल आयुष्याची किंमत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हॉस्पिटलच्या बेडवर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरही ही आज्जी आयुष्याची भरभरुन जगत आहे. ही आजी आपली मेकअप करण्याची हौस पूर्ण करताना दिसत आहे. त्यामुळे आयुष्य हे शेवटच्या श्वासापर्यंत जगा.
आयुष्य जगत असताना कोणत्या मार्गाने आपण जातोय, किंबहुना कोणता मार्ग आपण निवडतो याच गोष्टीवर आपलं भवितव्य निर्भर असतं. प्रत्येकाच्या आयुष्याचे मार्ग वेगवेगळे. काही स्वीकारलेले, काही आपलेसे करावे लागलेले. पण त्या एका क्षणी तुम्ही कोणता निर्णय घेता यावर तुमचा भविष्यकाळ निश्चित होत असतो. अर्थात आयुष्याच्या प्रवासात असे मार्ग बदलण्याचे प्रसंग अनेकदा येऊ शकतात, पण त्या प्रत्येक क्षणी कळीचा ठरतो तो तुम्ही त्या क्षणी घेतलेला निर्णयच! त्यामुळे आज उद्या करण्यापेक्षा आहे त्या क्षणाचा आनंद घ्या.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पाव्हणं जेवला काय? जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO पाहून म्हणाल शिक्षक असावा तर असा!
सोशल मीडियावर हा व्हिडीओ rekhashinde597 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये, “आयुष्य हे खूप थोडं आहे म्हणून हसून खेळून जगा आणि एन्जॉय करा, मन मारू नका हेच मला सांगणं आहे महिलांना”