सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. नेटकरी असे अनेक व्हिडीओ व्हायरल करताना दिसतात. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्या प्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नात झिंगाट डान्स करणाऱ्या आजीचा Video व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नसोहळ्याच्या हळदीमध्ये आजीसोबत तिच्या नाती सुद्धा नाचल्या आहेत. पाच सहा तरुणींसोबत पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसलेल्या आजी डान्स करत आहेत.पण या आजीच्या डान्सपुढे नातीचा डान्स देखील फिका पडला आहे. आजीने नववारी साडी नेसून डोक्यावर पदर घेत अशा काही डान्सच्या स्टेप केल्या आहेत जे पाहून सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. आजीचा हा जबरदस्त डान्स पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.आजीचा हा नागिन डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘तुझे अपना बनाने की कसम खायी है…’ भर मंडपात पुजारी झाले फिल्मी! Video पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजीच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे.