सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. शिवाय व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कधी आपलं मनोरंजन करणारे तर कधी आपणाला काहीतरी शिकवून जाणारे व्हिडीओ असतात. नेटकऱ्यांनाही असले व्हिडिओ पाहणं आवडत त्यामुळे ते आवडते व्हिडीओ नेटकरी शेअर करतात ज्यामुळे ते इंटरनेटवर व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आजी तिच्या सौंदर्याचे रहस्य सांगताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक आजी आपल्या नातीसोबत एका भाजीच्या दुकानासमोर काहीतरी खरेदी करण्यासाठी आल्याचं दिसत आहे. शिवाय ही आजी दिसायलाही खूप संदर असल्याचं नेटकरी कमेंट बॉक्समध्ये म्हणत आहेत.
व्हिडिओ व्हायरल –
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर Sneh Anand नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तिच्या नातवाने शूट केला असून व्हिडिओमध्ये एक आजी महिला ‘मी भोपळ्याची भाजी खाते, त्यामुळे मी सुंदर आहे’ असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. याशिवाय ती पुढे म्हणते की, ‘भोपळा खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत.’
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘ब्यूटी सीक्रेट ऑफ नानी’ असे लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज आणि ६३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शिवाय या व्हिडीओवर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ज्यामध्ये यावयातही या आजी सुंदर दिसत असल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे व्हिडीओतील आजींसारख सुंदर दिसायचं असेल तर भाज्या खायला हव्यात अशा कमेंटही काही नेटकरी करत आहेत.