Viral video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यत सगळेच अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्धीस येईल आणि कोणाची चर्चा होईल सांगता येत नाही. एका व्हिडीओमुळे अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात आलेत. असाच एका आजीचा व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आजी-आजोबांचा तर स्वॅगच वेगळा असतो. आत्तापर्यंत असे लाखो व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यामध्ये वयोवृद्ध लोकं आनंदात डान्स करतात. त्यांच्या या व्हिडिओंवरुन लक्षात घेण्यासारखे आहे की, आनंद साजरा करायला, कलेला वयाची मर्यादा नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असं म्हणतात की वय वाढलं तरी माणसाचं मन तरुण असलं पाहिजे. आजीचा हा व्हिडीओ बघून याची प्रचिती येते. डान्स करताना आजीचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवणारा आहे. तुम्ही हा व्हिडीओ बघितला, तर तुम्हालाही या आजींचे कौतुकच वाटेल.

सोशल मीडियावर कधीही कोणताही व्हिडीओ व्हायरल होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फारच मजेशीर आहे. या व्हिडीओमध्ये दोन आजीबाई तुफान डान्स करताना दिसत आहेत. नेटकऱ्यांकडून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील आजीबाईंचा डान्स मात्र कमाल आहे. या आजीबाईंचा डान्स अगदी तरुणांनाही लाजवेल असा आहे. या आजीबाईंचे लटके आणि झटके पाहून नेटकरी भलतेच खूश झाले आहेत. या व्हिडिओमध्ये तु्ही पाहू शकता, हा व्हिडीओ गावाकडील आहे.जिथे एका मंडळातर्फे गावातील महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केलेला आहे.दरम्यान त्या कार्यक्रमातील अ‍ँकरनी आजींसोबत ‘गंगू तारुण्य तुझं बेफाम ह, ग जसा इश्काहचा ऍटम बाम’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.आजींच्या डान्सचा उत्साह पाहून गावातील अन्य लोक टाळ्या वाजून त्यांचा उत्साह वाढवत आहेत.

पाहा व्हिडीओ

हे गाणं राम राम गंगाराम या चित्रपटातील आहे. दादा कोंडकेचा हा सुंदर असा चित्रपट आहे. उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी हे गीत गायलेल आहे. आणि राजेश मजुमदार यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ b_vishal_78 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “खूप मनापासुन त्या आई हा क्षण एन्जॉय करत आहेत. आयुष्यात येऊन एवढं तरी एन्जॉय करता आलं पाहिजे. पण घरच्या परिस्थितीमुळे कामामुळे महिलांना जमत नाही. विशाल दादा तुमच्या मुळे शक्य होते हे thank you. तुमचे सगळे कार्यक्रम छान असतात.” तर आणखी एकानं, “आताच्या पिढ्यांना हे जमणार पण नाही …शेवट पर्यंत डोक्यावरील पदर खाली पडु दिला नाही ही खरी आपली संस्कृती खुपच छान अशाच कार्यक्रमामुळे जुन्या काही लोकांचा एन्जॉय होत आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.