Viral video: वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशी आजीबाई व्हायरल होतो आहे, जिने असं काही करून दाखवलं आहे, ज्यामुळे सगळेच शॉक झाले आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये एका आजींनं आपल्या नातवाच्या लग्नात भन्नाट डान्स केलाय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आजूबाजूला महिलावर्ग डिजेच्या तालावर डान्स करत आहेत. या महिलाही आजीला पाहतच राहिल्या आहेत. तर आजीचा हा जबरदस्त उत्साह पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, याठिकाणी एका लग्नाचा हॉल दिसत आहे. या हॉलमध्ये अनेक नातेवाईक मंडळी आलेले दिसत आहे, अशातच नवरा नवरीच्या एन्ट्रीच्या कार्यक्रमात सर्वजण डान्स करु लागतात. यावेळी काही महिला नवऱ्या मुलाच्या आजीला तिथे आणतात आणि आजीचा उत्साह आणि डान्स तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहूच शकता. आजीने नववारी साडी नेसून हात वर करत “या गो दांड्यावरना बोलते नवरा कुणाचा येतो त्याच्या करवल्या गो करवल्या नाजुक-साजुक त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी सार्‍या” या मराठी गाण्यावर जमेल तसा डान्स केला आहे.

urmila kothare car accident video
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Suresh Dhas Karuna Dhananjay Munde
Suresh Dhas: बीड जिल्ह्याची करुण कहाणी सांगताना सुरेश धसांकडून करुणा मुंडेंचा उल्लेख; म्हणाले, “तिची तर…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Man Travelled Hanging Under Train
Madhya Pradesh : धक्कादायक! रेल्वेखाली चाकांजवळ लटकून तरुणाचा तब्बल २९० किलोमीटरचा प्रवास; Video व्हायरल
A woman filming a reel in the middle of the road caused a major disruption in Nawanshahr leading to a traffic jam
“अहो काकू… हे काय करताय?” भररस्त्यात ठेवली खुर्ची, त्यावर ठेवला मोबाईल अन् बिनधास्तपणे नाचू लागली महिला; Viral Video पाहून संतापले नेटकरी

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “अय्यो रामा रामा लफड्यात फसलो ना” मराठमोळ्या गाण्यावर माय-लेकींनी केला भन्नाट डान्स; VIDEO झाला व्हायरल 

सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. नेटकरी असे अनेक व्हिडीओ व्हायरल करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर makeupartist_pooja_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजीच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हंटलंय, “आजी जोमात” अशी कमेंट केली आहे.

Story img Loader