Viral video: सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. नेटकरी असे अनेक व्हिडीओ व्हायरल करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.तुम्ही आजी-आजोबांचे मनसोक्त डान्स करतानाचे देखील अनेक व्हिडिओ पाहिला असतील. त्यांच्याकडे पाहून असे वाटते की, आपले आयुष्य असे आनंदात जगता आले पाहिजे. सध्या असाच एक आजीबाईंचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये एक आजीबाई डान्स करताना दिसत असून नेटकरी या आजीबाईना चांगलीच दाद देत आहेत.

आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्या प्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नसोहळ्याच्या हळदीमध्ये आजीसोबत तिच्या नाती सुद्धा नाचल्या आहेत. पाच सहा तरुणींसोबत पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसलेल्या आजी डान्स करत आहेत.पण या आजीच्या डान्सपुढे नातीचा डान्स देखील फिका पडला आहे. आजीने नऊवारी साडी नेसून डोक्यावर पदर घेत अशा काही डान्सच्या स्टेप केल्या आहेत जे पाहून सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. सोडा सोडा राया हा नाद खुळा या मराठमोळ्या गाण्यावर आजीचा हा जबरदस्त डान्स पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.आजीचा हा डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_status नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आयुष्य असं आनंदात जगता आलं पाहिजे असे म्हटले आहे, तर काहींनी आजीबाईंचा नादच खुळा असे म्हटले आहे एका युजरने आजीबाईंचा उत्साह ओसांडून वाहत आहे असे म्हटले आहे.तर दुसऱ्या एका युजरने आतापर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ असे म्हटले आहे. तर काहींनी बघा हीच शेवटची पिठी आहे संस्कृती जपणारी शेवटची पिढी, डान्स करताना पदर डोक्यावरुन काली पडू दिला नाही. तसेच अनेकांनी आजीबाईंचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.